Home विदर्भ देवळी पोलीसांची ऑक्टोबर महिन्यात दारू विक्रेत्या विरोधात एकशे चाळीस कार्यवाह्या….!

देवळी पोलीसांची ऑक्टोबर महिन्यात दारू विक्रेत्या विरोधात एकशे चाळीस कार्यवाह्या….!

47
0

योगेश कांबळे

ठाणेदार नितीन लेव्हरकर यांचा नवीन विक्रम

वर्धा – देवळी पोलीस स्टेशन मागील महिन्यात दारु विक्रेत्या विरोधात देवळी पोलीसांनी केलेल्या कार्यवाहीत चक्क 140 दारूच्या कारवाई केल्या असल्याने नवीनच विक्रम नोदंविला गेला आहे. त्यामुळे ठाणेदार नितीन लेव्हरकर व पोलीस कर्मचारी यांनी नवीनच विक्रम नोंदविला आहे.
ठाणेदार नितीन लेव्हरकर यांनी आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा लक्ष पुरवून सुरू असलेले अवैध दारु धंदे बंद करण्याची मागणी दारूबंदी महिला मंडळाने केली आहे.
गेल्या गत दिवसात गणपती उत्सव व दुर्गा उत्सव पार पडलेला आहे.याच काळात देवळी चे ठाणेदार नीतीन लेव्हरकर यांनी दारू विक्रते व वाहतूक करणारे याचेंवर वचक बसण्याकरीता अवैध दारू धंदे करनार्यावर विशेष मोहीम राबवुन मागिल काही वर्षाची आकडेवारी पाहता , माहे ऑक्टोबर मध्ये एकूण 140 दारूच्या कारवाई करुण नवीनच विक्रम मांडलेला आहे .
देवळीचे ठानेदार नितिन लेव्हरकर . यानी पदाभार सांभाळल्यापासुन , अवैध दारू धंदे चालक , जूगार व गांज्या सारख्या कारवाह्या केलेल्या आहे. त्याचेवर कारवाई करुनही देखील, अवैध धंदे वाले न जूमानता, आपल अवैध धंदे चोरुन लपवुन सुरु ठेवतात. प्रभावी वचक बसण्याकरीता प्रोव्हीबीशन मोहीम राबवुन , देवळी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी सतत कारवाई करुण, दारु विक्रेते यांचेवर एक महीण्यात 140 कारवाई करण्यात आल्या आहे. अशा दारूवीक्रेत्याना न्यायालयात हजर केले जातात. पंरतु त्याना न्यायालयातून तात्काळ पर्सनल बॉन्ड व्दारे कीवा कॅश सिक्युरीटी व्दारे जामिन दीली जाते त्यामुळे दारु विक्रेताना या कारवाईचा कोणताही भय राहिलेला नाही . आज केस झाली की, दुसर्या दिवशी जामिनावर सुतून येतात व पुनुश्च आपले अवैध धंदे सुरु ठेवतात. याचा मनस्तप पोलीसांना सहन करावा लागत आहे.
वेळोवेळी कारवाई करुन देखील त्याना कायद्याची भीती राहलेली नाही . याकरीता न्यायालयाने ठोस पाऊले उचलने गरजेचे आहे. वेगळ्या कायद्यानुसार दारुविक्रेत्यांनावर प्रतीबंध बसण्याकरीता कलम 93 मुंबई दारु कायदयान्वये कारवाई केली जाते त्या कारवाई मध्ये उपविभागीय दंडाधिकारी वर्धा यांचेकडुन बॉन्ड घेतले जातात किंवा बॉन्ड रदद करण्याची कारवाई केली जाते . पंरतु अवैध दारु विक्रेते यांचे वेळीच बॉन्ड न घेण्याची प्रक्रीय होत नसल्याने , त्याचेवर प्रतीबंध बसविण्यास पोलीसांना अपयश येत आहे. मागिल अनेक वर्षाचे तूलनेत यावर्षातील ऑक्टोबर-2020 मध्ये देवळी पोलीसांनी दारुविक्रेत्याविरुध्द एकूण 140 केसेस एवढया मोठ्या प्रमाणात कारवाई करुन , त्याचेविरुध्द प्रतीबंधत्मक कारवाई म्हणून कलम 93 मुंबई दारु कायद्याप्रमाने 43 केसेस केलेल्या आहेत. यावरुन देवळी पोलिस हे दारुविक्रेत्यांवर एक प्रकारे वचक बसविण्याचा व समूळ करण्यास प्रयत्नशिल दिसुन येत आहे.
वर्धा जिल्हा हा दारु बंदी जिल्हा असून, जास्त प्रमाणात दारु विकल्या जाते, अशा दारुच्या अवैध धंदयावर वचक ठेवन्याकरीता उत्पादन शुल्क विभाग हे वेगळे विभाग असून , त्यांची अशा कारवाईवर उदासीनता दिसून येते . याचाच भार हा वर्षानुवर्ष पोलिस विभागावर पडलेला दिसतो . पोलीसांचा जास्त वेळ दारु बंदी बंदोबस्तात खर्च होतो.
आपले अत्खयारीत येत नसलेले काम सुध्दा पोलीसाना करावे लागत असून , दारुबंदीचे काम सुध्दा पोलीसांचे खाद्यावर पडलेला आहे. पोलीसांनी त्याचेवर वचक बसण्याकरीता त्यांना इतर विभागानी सहकार्य करण्याची नितांत गरज आहे. या कार्यवाहीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी ठाणेदार नितीन लेव्हरकर व पोलीस कर्मचारी यांचे कौतुक केले असून आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा ठाणेदार नितीन लेव्हरकर यांनी लक्ष पुरवून सुरू असलेले अवैध दारु धंदे बंद करण्याची मागणी दारूबंदी महिला मंडळाने केली आहे.