Home महत्वाची बातमी अट्टल मोबाईल चोरट्यास अटक शनिपेठ पोलिसांची कारवाई

अट्टल मोबाईल चोरट्यास अटक शनिपेठ पोलिसांची कारवाई

37
0

जळगाव : मोटरसायकलवरून पादचारी लोकांकडून मोबाईल हीसकवणाऱ्या अट्टल चोरटे शनिपेठ पोलिसांनी अटक केलीय. राकेश उर्फ रामा गोकुळ राठोड (वय-१८,रा.सांगवी ता.चाळीसगाव) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिवाजी महाराजांच्या नामकरणाचे फलक काढणाऱ्या प्रशासनाचे डोकं ठिकाणावर आहे का?
नीट परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व मास्क वाटप !
यासंदर्भात अधिक असे की, शनिपेठचे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश सिंग पाटील यांना गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीवरून शनिपेठ पोलिस स्थानकाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार व गुन्ह्यातील नमूद कार्यपद्धतीप्रमाणे सराईत गुन्हेगार राकेश उर्फ रामाला सांगवी येथून अटक केली आहे. त्याच्याकडून १३,९०० रुपयाचा ओपो कंपनीचा, १० हजार रुपये किमतीचा विवो, १० हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाइल तसेच ५० हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपी राकेश त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक (एम.एच २० डी.आर ९५२६) यावर त्याचा एक अल्पवयीन सहकाऱ्याच्या मदतीने रस्त्याने जाताना लोकांकडून हिसकावल्याचे कबूल केले आहे. दरम्यान आरोपीकडून आणखी काही इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.