Home जळगाव हिना- रिजवान यांचे जीवन मोइन ने फुलविले ,  भुसावळ येथे झालेले अनोखा...

हिना- रिजवान यांचे जीवन मोइन ने फुलविले ,  भुसावळ येथे झालेले अनोखा विवाह सोहळा

160

रावेर (शरीफ शेख) 

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ मोहम्मदिया नगर येथील रहिवासी हिना कौसर ही घटस्फोटिता आपल्या सहा वर्षाच्या रिझवान सोबत आपले एकाकी जीवन जगत होती.
तिने विचार ही केला नव्हता की तिचे जीवन एकदा पुनश्च बहरेल त्याच्या अनाथ बाळाला मोईन रूपाने नाथ मिळेल. व ती घटस्फोटित व बाळाची आइ असतांना तिला तरुण असा पती मिळेल.

मोहम्मदिया नगर मधील रहिवासी असलेले मोईन शेख तरुणाचं विवाह झालेला नव्हता आपल्यापेक्षा वयाने मोठी तसेच सहा वर्षाचा बाळ असतानासुद्धा मोइन शेख ने हीनाला आपला जीवनसाथी म्हणून निवडले व आपल्या पालकांना होकार कळविला.
वडील नईम शेख ,त्यांचे काका पापा कालू व रफिक कालू यांनी हिना चे आई व काका यांच्याशी बोलणी केली कारण हिना ला वडील सुद्धा नाही ते मृत झालेले आहे.
इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा शुक्रवारी संपूर्ण जगात वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांचे जीवन चरित्र आपल्या जीवनात आणण्याची प्रत्येक मुस्लिम समाजाच्या तरुणांनी प्रार्थना केली वास्तविक पाहता अंतिम प्रेषित यांचा सुद्धा पहिला विवाह आपल्या वयाने १५ वर्ष मोठ्या असलेल्या व विधवा असलेल्या हजरत खतीजा सोबत झालेला होता हीच परंपरा मोइन ने कायम ठेवत आपल्या शी वयाने मोठी असलेल्या व सहा वर्षाचा बाळ रिजवान सोबत जीवन जगत असलेल्या घटोस्पिता सोबत आपले विवाह केले.
समाजात व संपूर्ण मानव जातीला एक उपदेश दिलेला आहे या अनोखे विवाह चे खुत ब ए निकाह हाफिज रईस यांनी यांनी पठण केले तर या विवाहासाठी हिना तर्फे वकील म्हणून शौकत मजीद शेख यांनी व मोईन वधु तर्फे साक्षीदार म्हणून इम्तियाज शेख व युसुफ बागवान यांनी भूमिका अदा केली.
या विवाह समारंभात सर्व प्रमुख व प्रतिष्टीत व्यक्तींची उपस्थिती होती त्यात प्रामुख्याने हिना तर्फे तिचे भाऊ पोलीस कॉन्स्टेबल इम्रान शेख, वकार शेख ,शेख हसन, चिनावल चे माजी सरपंच कलीम डेप्युटी, नगर सेवक प्रतिनिधी साजिद शेख,तसलीम पठाण, अजीम हाजी,सैय्यद पोस्ट मास्टर, वारीस खान, वाहिद खान,ईल्यास शाह,गुफारान शेखआदींची उपस्थिती होती.
शतकातील अनोखा विवाह-फारूक शेख

सदरचा विवाह हा या शतकामधील एक अनोखा विवाह म्हणून नोंदविला गेला असल्याचे या नवविवाहित दाम्पत्यांना व त्यांच्या पालकांना जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देतांना आपल्या भावना व्यक्त केल्या व उपस्थित तरुणांना आव्हान केले आहे की अंतिम प्रेषितांचे जीवन चरित्र आपण अंगिकारले तर खरे आपण इस्लाम धर्माचे पाईक ठरू.