
रावेर (शरीफ शेख)
येथील राजेरघुनाथराव देशमुख सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात, रावेर येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल याची जयंती निमित्त त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवानदन करण्यात आले. तसेच माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी याची पुण्यतिथी निमित्त त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहीली.
यावेळी राजेरघुनाथराव वाचनालय व ग्रंथालयाचे सचिव अशोक शिंदे कामगार नेते दिलीपजी कांबळे, वंचितचे तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे, हिरालाल सोनोने, फुले, शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष राजेंद्र अटकाळे,गोपाळ मिस्तरी , कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेरघुनाथराव वाचनालय व ग्रंथालयाचे ग्रंथपाल रविंद्र सराफ यांनी तर आभार किरण सुर्यवंशी यांनी मानले.











































