Home मुंबई दिंडोशी पोलीसानी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची जनजागृती मोहीम….!

दिंडोशी पोलीसानी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची जनजागृती मोहीम….!

217

मुंबई मालाड पूर्व कासम बाग येथे महिला तसेच अल्पवयीन मुली आणि मुलांनी लैंगिक छळवणूक होऊ नये म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे. याशिवाय, आर्थिक फसवणूकीपासून काय सावधानता बाळगावी, अशा विविध बाबींचे दिंडोशी पोलिसांनी कासमबाग येथिल महिलांना शनिवारी मार्गदर्शन केले.

 

प्रतिनिधी : रवि गवळी

मुंबई : महिलांची विविध मार्गांनी होणारी आर्थिक फसवणूक, कौटुंबिक हिंसाचार आणि लैंगिक छळवणूक यातून त्यांनी कशी काळजी घ्यावी, पालक आणि शिक्षकांच्या जबाबदा-या अशा अनेक बाबींचा आढावा घेऊन कासमबाग मध्ये दिंडोशी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी महिलांना वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी मार्गदर्शन केले.

‘शाखा क्रमांक ३६ ’ येथील या उपक्रमाला परिसरातील सुमारे ७० महिला उपस्थित होत्या. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एकतर्फी प्रेमातून खून बलात्कार विनयभंगच्या तक्रारी अनेक सोशल मिडीयावर वायरल होत असतात झाल्यानंतर पोलिसांनी शहरात उपनगरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये महिलांच्या तक्रारींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून या चर्चासत्राचे आयोजन होते. यावेळी दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे सहायक निरीक्षक संदीप म्हस्के दिंडोशी पोलीस ठाणेच्या महिला पोलीस उपनिरीक्षक निलोफर शेख सहिदा मुलानी अधिकाऱ्यानीही मार्गदर्शन केले.

पूर्वी लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यात सात ते २० वर्षांपर्यंत शिक्षा होती. ती आता फाशीपर्यंत वाढवण्यात आली आहे. लहान मुलांच्या लैंगिक अत्याचारांच्या शिक्षेतही वाढ केली आहे. त्यामुळे अशा घटनांकडे पालक आणि मुलामुलींनी दुर्लक्ष न करता पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी पुढे आले पाहिजे, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव चव्हाण यांनी सांगितले. अशा घटनांच्या वेळी समाजाची, शिक्षकांची, पालकांची आणि पोलिसांचीही कशी महत्त्वाची जबाबदारी आहे, , बाललैंगिक अत्याचार कसे होतात, ते कसे रोखता येतील, याचे समुपदेशन पोलीस उपनिरीक्षक निलोफर शेख यांनी केले.

दहावीच्या आतील मुलांकडे शक्यतो मोबाइल फोन देऊ नका. कोणतीही गोष्ट मोफत मिळत नाही. त्यामुळे लॉटरीतील पैसे देण्याच्या, नोकरी लावण्याच्या, फेसबुकवरून मैत्री करण्याच्या नावाखाली कोणीही आर्थिक फसवणूक करतील, महिलांची अशा घटनांमध्ये लैंगिक छळवणूकही होते. त्यामुळे वेळीच सावध व्हा. अशाच काही घटना असतील तर जवळच्या पोलिसांना माहिती द्या, असेही आवाहन पोलिसांनी केले.फोनवरून कोणतीही माहिती देऊ नका.

फोनवरून कोणीही बँक किंवा इतर खासगी माहिती विचारल्यास ती देऊ नका. एटीएम किंवा बँकेशी संबंधित माहिती घेऊन बँकेतून पैसे काढले जातात. तसेच परदेशी मुलाशी लग्नाचे आमिष दाखवून मॅट्रोमोनियल साइटवरूनही फसवण्यात येते. तसेच खासगी फोटोही सोशल मिडीयातून शेअर करतांना काळजी घ्यायला हवी. त्यामुळे पालकांनीही सतर्कता बाळगली पाहिजे, असाही सल्ला यावेळी देण्यात आला. यावेळी मागील काही तक्रारींचाही पोलिसांनी मागोवा घेतला.आलेल्या सर्व महिलांना आपला भ्रमणध्वनी देऊन महिलांच्या सुरक्षेबाबत करावयाच्या उपाययोजना बाबत चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केले.