Home बुलडाणा निरोड व पेसोडा येथील हतबल दोन शेतकऱ्याने नैराश्यपोटी सोयाबीनच्या 20 एकराच्या उभ्या...

निरोड व पेसोडा येथील हतबल दोन शेतकऱ्याने नैराश्यपोटी सोयाबीनच्या 20 एकराच्या उभ्या पिकात फिरवला ट्रॅक्टर !

250

 

शासन कडून मदतीची अपेक्षा

ईरफानोद्दीन काझी ,

संग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील निरोड येथील नरेश धुत यांच्या मालकीचे निरोड शिवारात १० एककर शेत आहे तर पैसोडा येथील भगवान भिसे व सविता भगवान भिसे यांच्या नावे पैसोडा शिवारात १० एककर शेत या दोन्ही शेतकऱ्यांची या वर्षी शासनाने जाहिर केलेल्या कर्ज माफी यादीत नाव नसल्याने कर्ज माफी पासुन वंचीत राहिले पुर्वीच शेतावर कर्ज असल्याने बॅकांनी पिक कर्ज देऊ केले त्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांनी शेतात उसनवार करुन कसे तरी सोयाबीन पेरेले परंतु वातवरणाच्या बदलामुळे परतीच्या पावसाने बहरलेले सोयाबीन झाडांना शेगालागल्या पापड्याच राहिल्या शेंगा भरल्याच्या नाही त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची घोर निराशी झाली सोयाबीन उत्पादन खर्च निघत नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येताच निरोड व पेसोडा येथील शेतक-यांनी प्रत्येकी १० एक्कर एकुण 20 एक्करातील नैराश्य पोटी उभ्या सोयाबीन पिकात ट्रक्टर रोट्याव्हेटर फिरविले सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असुन आर्थिक विळख्यात सापडल्याने त्यात ७०% आणेवारी जाहिर केल्याने प्रत्येक्ष बाधावर जाऊन घटनास्थळ पंचनामे सादर करुन सुधारीत आनेवारी जाहिर करावी तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे सोयाबीनच्या ७५% शेंगा पोकळ असल्याने तालुका खारपाण पट्ट्यात येत असुन सोयाबीन उत्पादकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे त्यात शेतात सोयाबीन पेरणी मशागत खर्च एकरी १५ हजार व एकरी 2 ते 3 क्विंटल तेही ज्वारीच्या दाण्यासारखे व सोयाबीन उत्पन्न सोयाबीन तयार करण्यासाठी मळणी यंत्र एकरी १ हजार खर्च येत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लावलेला खर्च निघत नसल्याचे वस्तुस्थिती असल्याने काळजावर दगळ ठेवुन नैराश्य पोटी ट्रक्टर रोट्याव्हेटर फिरविले उसनवार घेतलेले पैसे परतीची चिंता व त्यात मुलाचे शिक्षण आरोग्य उपजिविका प्रपंच कसा चालवावा या चिंतेत सोयाबीन उत्पादक शेतकरी असुन निसर्गाने दगा दिला व एकदम वातावरणात बदल झाला त्यामुळे सोयाबीनची उभी झाडे करपली . सोयाबीनच्या शेंगामध्ये भरलेले दाणे ज्वारीच्या आकाराचे भरले आहेत . सद्यस्थितीत सोयाबीन सोंगणीला आले आहे . एकरी अडीच ते तीन क्विंटलचा उतारा लागत आहे . मशागतीचा एकंदरीत खर्च जवळपास एकरी १५ हजार रुपये लागलेला आहे . उतारा लागत नसल्याने मळणी यंत्रधारकांनी एकरी हजार रुपयांचे दर आहेत . सोंगणी , काढणी आणि आतापर्यंत झालेला खर्च पाहता उत्पादनाच्या दृष्टीने सोयाबीन सोंगणी करावी की नाही , या मनस्थितीत या भागातील शेतकरी अडकला आहे एवढे मात्र खरे शासना कडून मदतीची अपेक्षा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आहे