Home मराठवाडा माहूर – नवरात्र काळात भाविकांसाठी रेणुका देवीचे देऊळ बंदच.

माहूर – नवरात्र काळात भाविकांसाठी रेणुका देवीचे देऊळ बंदच.

332

मजहर शेख, नांदेड

नांदेड/माहूर,दि : १०:- साडे तिन शक्ती पीठा पैकी एक पीठ असलेले श्री रेणुकामातेचे मंदिर नवरात्र काळात ही भाविकांसाठी बंदच राहणार असल्याची माहिती मंदिराचे कोशाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांनी दि.१० ऑक्टोबर.रोजी सायं.४ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या वर्षी दि.१७ ते २५ ऑक्टोबंर.पर्यंत नवरात्र महोत्सव साजरा केला जाणार आहे.कोरोनाच्या महामारी चर्या संकटामुळे जनता व शासन हैराण आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करण्यासाठी मंदिरातील धार्मिक विधी शिवाय सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली धार्मिक विधींसाठी केवळ पुजाऱ्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल, त्या व्यतिरिक्त कुणाला ही प्रवेश दिला जाणार नसल्याने भाविकांनी माहूरगडा वर येऊ नये से आवाहान हि या वेळी करण्यात आले.
नवरात्र काळात दत्त शिखर मंदिरा खालील गावाकडील नागरिकांनी कामा निमित्त माहूर शहरात येताना आपले ओळख पत्र जवळ ठेवणे बंधनकारक असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांनी स्पष्ट करून सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाने सार्वजनिक जागेवर मंडप उभारून दुर्गा देवीची प्रतिष्ठापना करू नये तसेच मूर्तीची उंची ४ फुटांहून अधिक ठेवू नये अशा सूचना देखिल देण्यात आल्या या पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांनी केले.