Home बुलडाणा सोशल डिस्टंसिंग फज्जा उडवत कोरोना जनजागृती रॅली

सोशल डिस्टंसिंग फज्जा उडवत कोरोना जनजागृती रॅली

235

सोशल डिस्टंसिंग फज्जा उडवत कोरोना जनजागृती रॅली

.

कोणतेही सोशल डिस्टन्स न ठेवता काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीला कोणत्याही अधिकाऱ्यांने मज्जाव न करने म्हणजे काय?

 

बुुुलडाना ,

करोना रोखण्यासाठी सर्वात मोठा उपाय म्हणजे तोंडावर मास्क व सोशल डिस्टंसिंग हे होय यासाठी शासन प्रशासन सेवाभावी संस्था आपल्या परीने विविध उपाययोजना करून जनजागृती करीत आहे मात्र मेहकर शहरात 9 ऑक्टोंबर रोजी ग्रामीण भागातून आलेल्या एका ग्रामपंचायतीचे सरपंच ,गावकरी सरपंच पती यांनी जनजागृती रॅली काढली मात्र यात कोणतेही सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आलेले नव्हते ही घोळक्यात आलेली रॅली पंचायत समिती,उपवीभागीय महसूल अधिकारी कार्यालय,मेहकर पोलीस स्टेशन येथे गेली मात्र यावर कोणतेही अधिकारी यांनी लक्ष दिले नाही त्यामुळे या रॅलीच्या माध्यमातून सोशल डिस्टंसिंग ही अट कोरोना प्रोटोकाल मधून निघून गेली की काय हा प्रश्न जनसामान्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे.
मेहकर तालुक्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी व कोरोना प्रादुर्भाव वाढु नये यासाठी विविध उपाय योजना करण्याचे काम मेहकर येथून होते यात पोलीस प्रशासन व नगर पालिका विना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करते तर महसूल विभाग ,पंचायत समिती व पोलीस विभाग हे ग्रामीण भागात कोरोना प्रोटोकॉल नुसार जेथे नियम मोडल्या जात असतील तेथे कार्यवाही करण्याचे काम करते मात्र ९ सप्टेंबर रोजी अस्वलाच्या माध्यमातून जी जनजागृती करण्यात आली तिने संपूर्ण मेहकर शहरात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवल्याचे दिसून येत आहे इतकेच नव्हेतर ही रॅली पंचायत समिती,पोलीस स्टेशन व उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या कार्यालयाला सुद्धा भेट दिली मात्र सोशल डिस्टन्स नसलेल्या या रॅलीवर कोणीही लक्ष दिले नाही हे मात्र चर्चेचा विषय होऊन गेला .