Home मराठवाडा वाळू बंद असल्यामुळे मंजूरावर उपासमारीची वेळ  वाळू चालू करुन मंजूरांच्या हाताला काम...

वाळू बंद असल्यामुळे मंजूरावर उपासमारीची वेळ  वाळू चालू करुन मंजूरांच्या हाताला काम देण्याची मागणी

78
0

प्रतिनिधी / अंबड

जालणा – तालुक्यातील बांधकाम मंजूर व मिस्त्री सध्या मोठया अडचणीचा सामना करत आहेत गेल्या अनेक महिन्यापासून तालुक्यात वाळू बंद असल्यामुळे नविन घराचे बांधकाम बंद आहेत बांधकाम बंद असल्यामुळे बांधकाम मंजूरांच्या हाताना सध्या काहीच काम नाही त्यामुळे मंजूरावर उपासमारीची वेळ आली आहे.
अंबड येथील ठेकेदार खाजा सय्यद यांनी जिल्हाधिकारी व अंबड पोलिसांना निवेदन दिले आहे यामध्ये म्हटले आहे की गेल्या वर्षाभरात वाळू बंद असल्यामुळे शहरात व तालुक्यात बांधकाम बंद आहेत त्यामुळे मजूरांच्या हाताला काहीच काम नाही त्यामध्ये कोरोणा मुळे काम बंद होते कोरोणा व वाळू यामुळे काम बंद पडले आहेत.
सध्या कोरोणाचा प्रादुरभाव कमी झाला असला तरी वाळू सुरु झाली नाही त्यामुळे सर्वच कामे बंद आहेत.त्यामुळे शासनाने वाळूचा रितसर टेंन्डर करुन वाळू सुरु करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
मंजूरावर उपासमारीची वेळ –
वाळू मुळे काम बंद आहे त्यामुळे मंजूरावर उपासमारीची वेळ आली आहे शासनाने बांधकाम मंजूरांना काही तरी काम उपलब्ध करुन द्यावे
खाजा सय्यद , ठेकेदार