Home विदर्भ मोफ़त शिक्षा स्पर्धा परिक्षा केंद्राचे उद्घाटन…!

मोफ़त शिक्षा स्पर्धा परिक्षा केंद्राचे उद्घाटन…!

123

यवतमाळ – (प्रतिनिधी/वासीक शेख) पुसद येथे सर्व समाजातील मुलांसाठी प्रो.सलमान सय्यद सरांनी शिक्षा कॉम्पिटिटीव्ह फोरम अंतर्गत पोलिसभर्ती लेखी प्रशिक्षण केंद्र अजमी अहमद हाईट्स,पुसद येथे दिनांक,६ ऑक्टोबर २०२० रोजी सुरू केले आहे. सदर कार्यक्रमाचे उदघाटन हाजी.जब्बार भाई ठेकेदार यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सय्यद इश्तियाक साहेब हे होते तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हाजी.जब्बार भाई आणि आजमी अहमद ठेकेदार आणि अमजद भाई हे लाभले होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन असरार अहमद सरांनी केले, तसेच कार्यक्रमा साठी आम्हाला नदीम सर,फहिम सर, नुरुल्लाह जनाब ,हकिमोद्दीन करिमोद्दीन भाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास मार्गदर्शक म्हूणून आसिफ सर,सैफ सर,अर्शद सर ,आदिल मिर्झा सर ,फिरोज भाई हे उपस्थित होते ,आणि या सर्वांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनकेले तसेच प्रा.सलमान सय्यद सरांच्या या प्रयत्नाची प्रशंसा सुद्धा केली.

सर्व समाजा तील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी आणि मुलांना प्रशासनात स्थान मिळावे या उद्देशाने प्रा.सलमान सरांनी हे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले आहे.त्या अनुषंगाने आगामी पोलिस भर्ती साठी सर्व विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी पोलिस भर्ती वर्ग सुद्धा सुरू केले आहेत .या कार्यक्रमा नंतर सर्व विद्यार्थ्यां मध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. आणि सर्व पुसदकरी मंडळीं तर्फे प्रा.सलमान सय्यद सरांचे कौतुक होत आहे.पुसद मधील ज्या विद्यार्थ्यांना या मध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी प्रा.सलमान सरांशी भ्रमणध्वनी क्रमांक ९१५८९४९४०९ वर संपर्क साधावा.