Home विदर्भ विधानसभा अध्यक्ष नाना भाऊ पटोले आले, अन ” सानिका “चे अश्रु...

विधानसभा अध्यक्ष नाना भाऊ पटोले आले, अन ” सानिका “चे अश्रु पुसुन गेले

209
0

देवानंद जाधव 

यवतमाळ –  महाराष्ट्र विधानसभा सभापती नाना भाऊ पटोले म्हणजे मातीशी नाळ जुळलेले देवदुत अशी भावविभोर भावना हिवरी वासीयांची झाली आहे. रोज दररोज आभाळभर बातम्या जगभर फिरत असतात. त्यातलीच एक बातमी
” बापाची तिरडी अंगनात,
अन् लेक गेली परिक्षा केंद्रात ” चक्क विधान भवनात पोहोचली. ज्यांच्या विचारात अत्यंत स्पष्टता ,पारदर्शकता आणि आचरणात समाज परिवर्तनाची शक्ती आहे. अशा नाना भाऊंनी तत्काळ माझ्या मोबाईलवर संपर्क करुन सानिकाचे अभिनंदन करुन कौतुकाची थाप मारली होती. विदर्भात आल्यावर मी तुझ्या घरी येऊन तुझे अभिनंदन करेन ,तुझ्या शिक्षणाची पुढील सोय करुन देईल, असे वचन दिले होते. ती वचनपुर्ती चार ऑक्टोबरला झाली. सानिकाच्या वडीलाची तिरडी अंगनात बांधत असतानाच त्याच दिवशी तिचा संस्कृत विषयाचा पेपर होता, आईच्या मळकटलेल्या साडीच्या पदराने डबडबले डोळे पुसत ती परीक्षा केंद्रात पोहोचली. आई ही मुलांची पहीली शाळा असते. तर शाळा ही मुलांची दुसरी आई असते. या दोन्ही आईने सानिका च्या कर्तृत्वाला सलाम ठोकला. तिला संस्कृत विषयात तब्बल पैकी च्या पैकी मार्क मिळाले. शिवाय अन्य विषयात तब्बल ९८टक्के गुण मिळवत अव्वल आली. नाना भाऊंनी दिलेला शब्द पाळला. आजकाल लोक हवामान खात्यावर विश्वास ठेवतात, पण पुढा-यावर…….नाही. हे वास्तव आहे. पण सभापती महोदय याला अपवाद ठरले, ते सानिकाच्या घरी आले. मायेच्या ममतेने विचारपुस केली. कधीकाळी सोन्याचा धुर निघणा-या देशात अलीकडे शेतक-यांच्या सरणाचा धुर निघत आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. सानिकाचा बाप …घरच्या वावरात परिवाराच्या पोटासाठी आणि लेकरां बाळांच्या स्वप्नपूर्ती साठी कष्ट ऊपसता ऊपसता दृष्टीआड झालाय, त्या सुधाकर पवार च्या पाउलखुणांना नानाभाऊंनी सानिका च्या घरी आल्या आल्याच विनम्र श्रद्धांजली वाहीली. यावेळी ऊपस्थीत तमाम हितचिंतकांचे डोळे डबडबुन आले. आभाळाच्या ऊंचीचा देवदुत अर्थात नानाभाऊ चादरीवर बसले, परीवाराला जवळ घेत, सानिकाला दुःखाच्या गणिताला सोडविण्याचे सुञ सांगीतले. तिची लातुरच्या नामांकित काॅलेज मध्ये अॅडमिशन करुन दिली. या वर्षीचा एकलाख पाच हजाराचा डी. डी तिला सुपूर्द केला. शिवाय प्रशासकीय अधिकारी बनण्याचा वडीकीचा सल्ला दिला. सानिका तु भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा वडीलकीचा धिर दिला. तु शिक वाट्टेल तेवढे शिक..पैस्याची काळजी करु नकोस…मी आहे. लोखंड पाण्यावर तरंगत नाही पण लोखंडाचे खिळे लाकडावर ठोकुन पाण्यात सोडल्यास तरंगते. हा वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगीतला. पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारते, आणि मस्तक सुधारल्यावर माणुस कुठेही नतमस्तक होत नाही हा वसा तमाम विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे, हा लाखमोलाचा संदेश नानाभाऊंनी दिला. अशा अथांग अंतकरणाच्या या देवदुतांना हिवरी सारख्या गोजिरवान्या गावात आणण्यासाठी विदर्भ प्रदेश किसान काॅग्रेसचे अध्यक्ष तथा लढवय्ये शेतकरी नेते देवानंद पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला, यावेळी जनतेच्या मनातील आमदार बाळासाहेब मांगुळकर यांचे सह वामणराव कासावार, किर्ती गांधी, विजय खडसे यांचे सह शेकडो नेत्यांची ऊपस्थीती होती. अतुट आत्मीयतेच्या विलोभनीय धाग्यांनी आपल्या सर्वांची मने एका धाग्यात ओवुन अल्पावधीतच महाराष्ट्रतील जनतेचे मन जिंकणा-या नाना भाऊ सारख्या देवदुतास तमाम हिवरी वासीयांचा मानाचा मुजरा.