Home मराठवाडा महाज्योती योजने करीता भरीव निधी देऊन ओबीसी जनगणना करावी…!

महाज्योती योजने करीता भरीव निधी देऊन ओबीसी जनगणना करावी…!

61
0

घनसावंगी तहसील मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन.

घनसावंगी–लक्ष्मण बिलोरे

महाज्योती योजने करीता भरीव निधी मिळावा तसेच जातीय आरक्षण देवुन ओबीसी जनगणना करण्यात यावी,याकरिता घनसावंगी तालुक्यातील समस्त ओबीसी समाजाकडून घनसावंगीचे तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले.याविषयी अधिक माहिती अशी कि,ओबीसी समाजाकरीता शासनाकडुन महाज्योती योजने अंतर्गत योजना चालु करण्यात आलेली होती.त्यानुसार ओबीसी समाजाला महाज्योती योजनेमधुन भरीव वाढीव निधी देण्यात यावा तसेच धनगर समाजाला एसटी प्रवर्गात घेवुन त्यांच्यावरील अन्याय दुर करण्यात यावा, वंजारी समाजाला वाढीव आरक्षण द्यावे त्याचबरोबर शासनाकडुन ओबीसी जनगणना करण्यात यावी.याकरिता घनसावंगीचे नायब तहसिलदार खैरनार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी जयभगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.रमेश तारगे, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष तुळशीराम कोरडे,रघुनाथ सोसे,गजानन वायसे,न्यानेश्वर सानप,दत्ता गाढ़वे,शरद कोरडे,आकाश गायकवाड़,बद्रीनाथ गाढ़वे आदिची उपस्थित होते.