Home विदर्भ पोलीस बॉईज असोशियन यवतमाळ तर्फे शहरातील ‘कोरोना योद्धा’ नागरिकांना सन्मानपत्राचे वितरण

पोलीस बॉईज असोशियन यवतमाळ तर्फे शहरातील ‘कोरोना योद्धा’ नागरिकांना सन्मानपत्राचे वितरण

194

यवतमाळ , ( वासीक शेख) – आज संपूर्ण देश कोरोण्यासारख्या महामारीने त्रस्त झालेला आहे।अशा या महामारी च्या काळात यवतमाळ शहरातील काही शूरवीर नागरिकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता यवतमाळ शहराचे नागरिकांची सेवा केली। असेच करोना योद्धा नागरिकांचे पोलीस बॉईज असोशियन यवतमाळ च्या वतीने सन्मानपत्र देऊन समान करण्यात आलेेे.

संपूर्ण देश कोरोना सारख्या महामारीने लढत आहे अशा वेळी आपल्या जिवाची पर्वा न करता यवतमाळ शहरातील नागरिकांना समर्पित सेवेबद्दल व दयनीय परिस्थितीत आपण केलेले समर्पण अस्वीकार्य आहे। व आपण सर्व सुपरहिरोसारखे लढा देत आहोत। औदार्य म्हणजे करण्याचा एक व्यायाम आहे।एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे की इतरांना मदत करणे हा एक आशीर्वाद आहे जो प्रत्येकास मिळत नाही। कारण जेव्हा आपण इतरांना वाढण्यास मदत करतो तेव्हा आपण प्रक्रियेत वाढतो। असे विचार पोलीस बॉईज असोशियन यवतमाळचे वतीने “करोना योद्धा” या सन्मानाने यवतमाळ येथील नागरिक श्री खलील अहमद सर,श्री मुश्ताक गौरी सर,श्री एम झेड रहमान सर,श्री मोहसिन खान सर,व श्री समीउल्ला खान सर यांना ‘कोरोना योद्धा’ या सन्मानाचे सन्मानपत्र देताना श्री अतीक हाजी शेख अफज़ल,अध्यक्ष पोलीस बॉईज असोशियन यवतमाळ व मुहम्मद फैसल,सदस्य पोलीस बॉईज असोशियन यांनी व्यक्त केले। या सर्व नागरिकांना पोलीस बॉईज असोशियन यवतमाळ तर्फे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.