Home मराठवाडा विकासकामात कोणतेही राजकारण करणार नाही-पालकमंत्री राजेश टोपे

विकासकामात कोणतेही राजकारण करणार नाही-पालकमंत्री राजेश टोपे

244

विकासकामात कोणतेही राजकारण करणार नाही-पालकमंत्री राजेश टोपे

परतूर-मंठा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची प्रत्येक्ष पाहणी
लोअर दुधना प्रकल्पसाठी जमिनी लवकरच संपादित करून मावेजा देण्यात येईल

शेख अथर

परतूर /प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे लोअर दुधना चे पाणी संपादित न केलेल्या जमिनीत गेल्याने पिकांची नासाडी झाली आहे. त्या जमिनी तात्काळ शासन संपादित करून त्याचा मोबदला देणार व पिकांचे पंचनामे करून त्यांना पण तात्काळ नुकसान भरपाई देणार तसेच विकास कामात कोणत्याही प्रकारे राजकारण करणार नसल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी युवक चे जिल्हा अध्यक्ष कपिल आकात यांच्या ”जय भवानी” निवास्थानी आयोजित पत्रकार परिषदेत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मागील दिवसात परतूर मंठा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली यामुळे निम्न दुधना प्रकल्पाची दरवाजेही उघडले पण या धरणाच्या शेजारी असणाऱ्या व भूसंपदीत न केलेल्या जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी आले या मुळे पिकांची नासाडी होऊन हाता तोंडाशी आलेले सोयाबीन,कापूस,तूर,ऊस या सारखी पिके पाण्यात गेली. या संदर्भात राष्ट्रवादीचे युवक जिल्हा अध्यक्ष कपिल आकात यांनी सर्व पुरावे पालकमंत्री राजेश टोपे याना सादर केली होती त्या अनुषंगाने हा दौरा आयोजित करण्यात आला होता. काही ठिकाणी श्री टोपे यांनी बैलगाडीत जाऊन पिकांची पाहणी केली . हा प्रश्न येत्या पंधरा दिवसात संबंधित खात्याच्या मंत्र्या सोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. या वेळी त्यांच्या सोबत आ. राजेश राठोड,युवक जिल्हा अध्यक्ष कपिल आकात ,शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष ए. जे. बोराडे,युवा नेते कपिल आकात,शिक्षण व आरोग्य सभापती कल्याण सपाटे,कुणाल आकात,राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष रमेश सोळंके,विक्रम तौर, शाम तेलगड,विजय राखे,अखिल काजी,डॉ.प्रदीप चव्हाण,अँड. अनंता मस्के,मधुकर झरेकर, ओंकार काटे, उपविभागीय अधिकारी, भाऊसाहेब जाधव,तहसीलदार रूपा चित्रक आदी उपस्थित होते.

★★★चौकट★★★

कोरोना ची लस डिसेंबर पर्यंत येण्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे.या लसीची प्राथमिक चाचणी घेण्याची सुरुवात झाली असल्याचे ते म्हणाले.

*फोटो ओळी*K- बैलगाडीतून पिकांची पाहणी करण्यासाठी जाताना पालकमंत्री राजेश टोपे,कपिल आकात ,कुणाल आकात आदी दिसत आहे.
*छाया-शेख अथर परतूर*