Home विदर्भ पाच महिन्यापासून दिव्यांग मानधनाच्या प्रतीक्षेत

पाच महिन्यापासून दिव्यांग मानधनाच्या प्रतीक्षेत

113
0

मनोज गोरे 

कोरपना – कोरपना तालुक्यातील दिव्यांग तसेच विविध निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मागील पाच महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरपना तालुक्यात निराधार अनुदानधारकांची संख्या बरीच आहे. लॉकडाउनमुळे सर्व कामधंदे बंद आहेत. कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांना काम मिळेनासे झालेले आहे. यातच निराधारांचे पाच महिन्यापासून पगार झाले नसल्याने त्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. निराधार बँकेच्या चकरा मारत असताना दिसत आहेत. पण अजुनही मे, जुन, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या पाच महिन्याचे पगार झाले नाही. त्यामुळे निराधार मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या समस्येकडे शासनाने लक्ष देवून निराधारांचे अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी प्रहार संघटनेचे अफ्रोज अली यांनी केली आहे होत आहे. विचारणा केली असता, कोरोना महामारीमुळे निधी आला नाही. विलंब झाला परंतु एक मेल आला आहे त्यामध्ये चार-पाच दिवसात निधी उपलब्ध होवून निराधारांचे अनुदान मिळतील, अशी माहिती त्यांनी दिली.