Home मराठवाडा सदर बाजार पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी बॅटरी चोराला केले सहा तासात जेरबंद

सदर बाजार पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी बॅटरी चोराला केले सहा तासात जेरबंद

121
0

जालना –  लक्ष्मण बिलोरे

२ ऑक्टोंबर रोजी तक्रारदार रईस कुरेशी राहणार पिवळा बंगला जालना यांनी पोलिस स्टेशन सदर बाजार जालना येथे तक्रार देऊन कळविले होते की त्यांची आयशर गाडी क्रमांक एम एच २१/६२६४ आयशर वाहन चमडा बाजार जालना येथे दुकानासमोर उभे करून पिवळा बंगला येथे त्यांच्या राहत्या घरी गेले असता रात्री अंधाराचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीने त्यांच्या गाडीची बॅटरी चोरुन नेली अशा वर्णनाची तक्रार दिल्याने सदरचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार यांच्याकडे दिल्याने त्यांनी रात्रगस्त दरम्यान माहिती काढून बॅटरी चोर वल्ली उर्फ नवशाद पिता हरून कुरेशी वय २२ वर्षे राहणार लंगर शहाबाबा चमडा बाजार जालना यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून चोरलेली आयशर वाहनाची बॅटरी, दोन हजार रुपये किंमतीची सहा तासाच्या आत जप्त केली व आरोपीस जेरबंद करून पुढील तपास करीत आहे . सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक विनायक देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास दांडगे, पोलिस कॉन्स्टेबल सुनील मस्के व होमगार्ड गौस मोहम्मद यांनी केली.