Home मराठवाडा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिली धर्माबाद पोलीस ठाण्यास भेट.

पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिली धर्माबाद पोलीस ठाण्यास भेट.

59
0

मजहर शेख, नांदेड

धर्माबाद , दि. ०४ :- नांदेड जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री प्रमोद शेवाळे यांनी दि.०३/१०/२०२०रोजी पोलीस स्टेशन धर्माबाद येथे भेट दिली.

भेटी दरम्यान त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या अडी-अडचणी विचारून घेतल्या.

 

 

त्यानतंर कोरोना महामारीकाळात काय दक्षता घ्यायचे आहेत व आपले कर्तव्य कसे पार पाडायचे या बाबतमार्गदर्शन केले. तसेच माझे कुंटुब माझी जबाबदारी ही संकल्पना समजावुन सांगुनती यशस्वी पणे राबविण्या बाबत सुचना दिल्या.


तदनंतर पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी पोलीस स्टेशन धर्माबाद च्या परिसराची व मुख्य इमारतीची पाहणी केली.तसेच पोलीस स्टेशनच्या अभिलेखाची पाहणी केली असता साफसफाई , निटनेटकेपणा व तंतोतंत अभिलेख या बाबत समाधान व्यक्त केले.यावेळीउप विभागिय पोलीस अधिकारी डॉ.सिद्धेश्वर धुमाळ उप विभाग बिलोली चार्ज धर्माबाद
तसेच पोलीस स्टेशनचे पो.नि. सोहन माछरे , सहायक पोलिस निरीक्षक अशोक उजगरे, पोउपनि. आणील सनगल्ले , पोउपनि , गणेश कराड व सर्व कर्मचारी उपस्थित होते.