Home महाराष्ट्र आमचं गाव, आमचा विकास उपक्रमांतर्गत आदर्श ग्रामपंचायत करणार – सरपंच सावंत चोचिंदे...

आमचं गाव, आमचा विकास उपक्रमांतर्गत आदर्श ग्रामपंचायत करणार – सरपंच सावंत चोचिंदे येथे १४ वित्त निधीतून महिला मेळावा, कौशल्य विकास प्रशिक्षण व आरोग्य शिबिर उत्साहात…

107
0

महाड – रघुनाथ भागवत

रायगड , दि. १२ :- केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकास योजनांचे लाभार्थी हे अंतिमतः गावातील ग्रामस्थ असतात. योजनेच्या प्रभावी फलनिष्पत्तीसाठी या लाभार्थींचा सक्रिय सहभाग, नियोजन व अंमलबजावणीमध्ये आवश्यक ठरतो. या योजनांची अंमलबजावणी, योजनांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्याचे बंधन ग्रामपंचायतीवर असते. ग्रामपंचायतीचा लोकसहभाग ग्रामपंचायत विकास आराखडा आपण तयार केलेला असून त्या दृष्टीने आमचं गाव, आमचा विकास हा राज्य शासनाचा उपक्रम यशस्वी राबवून आपले गाव तालुक्यात आदर्श गाव करणार असे प्रतिपादन सरपंच आमृता सावंत यांनी केले.

१४ वित्त आयोगाच्या निर्देशानुसार आमचं गाव, आमचा विकास अंतर्गत राबविण्यात आलेल्या ग्रामपंचायत चोचिंदे येथे विविध विकास उपक्रमाप्रसंगी सरपंच अमृता सावंत बोलत होत्या. यावेळी उपसरपंच संतोष मिरगल, सदस्य जान्हवी धाडवे, गीता गोलांबडे, सागर नगरकर, विश्वास पवार, पौर्णिमा लाखन, अनिल कोदरे, राजश्री चिविलकर, रिया चिविलकर, ग्रामसेविका राखी बुटाला, तंटामुक्ती अध्यक्ष जयराज जाधव, अमित सावंत आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
सावंत पुढे म्हणाल्या की, गावाच्या सर्वसमावेशक व सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीस विविध स्वरूपाची कामे किंवा उपक्रम हाती घेण्यासाठी अबंदीत निधीची आवश्यकता भासते. सध्या राज्यातील ग्रामपंचायतींना मालमत्ताकर, पाणीपट्टीकर व राज्य शासनाकडून प्राप्त होणारा महसूल हिस्सा हे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहेत. ग्रामपंचायतीस व निधीचे अंदाजपत्रक दरवर्षी तयार करून त्यामधून ग्रामस्थांना मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करते. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना त्यांच्या स्वउत्पन्नाच्या बाबी शिवाय चौदाव्या वित्त आयोगाने अंतर्गत मोठ्या प्रमाणावर सबंधित, मुक्तनिधी प्राप्त होत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत निधीच्या नियोजनाचे संपूर्ण अधिकार ग्रामसभेस आहेत, त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामपंचायतींना सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी मिळणाऱ्या निधीचे नियोजन ही ग्रामसभा करते. ग्रामपंचायतीस चौदाव्या वित्त आयोगआंतर्गत व इतर स्त्रोतातून मिळणाऱ्या बंदित निधीचे नियोजन ग्रामस्तरावर लोकसहभागातून गावाच्या गरजा, निकड व प्राधान्य क्रमानुसार करावयाचे आहे. त्यादृष्टीने गावातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व इतर घटकांचे क्षमता बांधणी व प्रशिक्षण आवश्यक असून प्रत्येक ग्रामपंचायतीचा लोकसहभाग ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आमचं गाव, आमचा विकास हा उपक्रम राज्य शासनाने हाती घेतलेला आहे त्या दृष्टीने आपण आराखडा तयार करून गावाच्या विकासासाठी सज्ज झालेला आहोत आणि गावाचा विकास करून संपूर्ण तालुक्यामध्ये आदर्श ग्रामपंचायत करण्याचा आपला मानस आहे असे देखील त्या यावेळी म्हणाल्या.

१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कृषी, लघुसिंचन, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक वनीकरण, लघु व कुटीर उद्योग, पिण्याचे पाणी, प्राथमिक शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, इमारती व दळणवळण, माहिती व तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा या मूलभूत सेवा नियमितपणे व प्रभावीपणे देण्यासाठी ग्रामपंचायतीने उपलब्ध होत असलेल्या व स्वतःच्या नियंत्रणाखाली असलेल्या निधीचा सुयोग्य वापर करण्याचा दृष्टिकोन ठेवून यावेळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र चिंभावे येथील सुप्रिया तळेकर यांनी रक्त, लघवी तपासणी केली, तसेच यावेळी कौशल्य विकास प्रशिक्षण व महिला मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता. दिलासा फाऊंडेशनचे किरण शिरगावकर, मंगेश खांडेकर तसेच डॉ. जाधव हेदेखील उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आभार ग्रामपंचायतीने मानले.