Home सोलापुर भुरीकवठे येथील ज्ञानदान सार्व.वाचनालय तर्फे विवेकानंद जयंती निमित्त गुणगौरव सोहळा.!

भुरीकवठे येथील ज्ञानदान सार्व.वाचनालय तर्फे विवेकानंद जयंती निमित्त गुणगौरव सोहळा.!

29
0

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट , दि. १२ :- तालुक्यातील भुरीकवठे येथे १२ जानेवारी युवक दिन व महर्षि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त येथील ज्ञान दान सार्वजनिक मोफत वाचनालयाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणी जनांचा गुणगौरव व युवा दिन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती सचिव चंद्रकांत पोतदार यांनी दिली आहे.
अक्कलकोट तालुक्याचे नुतन आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी याचा जाहिर सत्कार सोहळा ज्ञानदान सार्वजनिक वाचनालया तर्फे होणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा ग्रंथलाय अधिकार संतोष जाधव उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने विविध सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रम होणार आहेत.भुरीकवठे येथील ग्रंथलाय समोर कार्यक्रम होणार आहे. दि. १२ जानेवारी २०२० रविवारी रोजी सायंकाळी ४ वाजता कार्यक्रम होणार आहे.

पंचक्रोशीतिल नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक चंद्रकांत पोतदार यांनी केला आहे.

Unlimited Reseller Hosting