Home जळगाव रावेर येथे फुले , शाहू,आंबेडकर वाचनालयात राजमाता मॉ जिजाऊ याची ४२२ वी...

रावेर येथे फुले , शाहू,आंबेडकर वाचनालयात राजमाता मॉ जिजाऊ याची ४२२ वी जयंती मोठया उत्साहात साजरी

18
0

शरीफ शेख

रावेर , दि. १२ :- येथील फुले , शाहू , आंबेडकर सार्वनिक वाचनालय व ग्रंथालयात हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी ज्यांनी छत्रपती शिवरायांना ज्ञान,चातुर्य,चरित्र, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू दिले अशा राजमाता जिजाऊ यांची ४२२ वी जयंती निमित्त फुले,शाहू, आंबेडकर सार्वनिक वाचनालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करुन दिप व धुप पुजा करुन उपस्थितानी अभिवादन केले.

यावेळी पितांबर ठाकणे गुरुजी , फुले , शाहु , आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे, युवा सामाजिक कार्यकर्ते संघरक्षक उर्फ धुमाभाऊ तायडे, सुविधा ऑनलाईनचे राहुल डी.गाढे,संतोष गाढेसर,अशोक श्रीखंडे, संतोष पाटील, मुकेश महाजन, समाधान महाजन, लक्ष्मण पाटील, मुख्याध्यापक रविंद्र तायडे, बबलु अवसरमल, बाळु तायडे,‍,नितीन तायडे,सुधीर सैगमिरे,राहुल सुरदास,राहुल राणे,गोपल अटकाळे, गणेश चहावाले, यांचेसह मोठया प्रमाणात वाचक वर्ग उपस्थित होता.

यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जितेंद्र ढिवरे यांनी तर आभार अमर पारधे , यानी मानले.