Home बुलडाणा कृषीदुताने सादर केले बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक

कृषीदुताने सादर केले बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक

113
0

 

 

 

रवी जाधव ,
देऊळगाव मही:- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित स्वातंत्र्य विर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय जळगाव जामोद येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी संकेत कंकाळ याने देऊळगाव माही येथे “ग्रामीण कृषि कार्यानुभव ” कार्यक्रमा अंतर्गत बीज प्रक्रिया कशी करावी व बीज प्रक्रियेचे पिकांना होणारे फायदे या विषयी सखोल माहिती शेतकऱ्यांना दिली. यावेळी वसंता इंगळे भानुदास सानप, मिनाबाई इंगळे , सुमित खरे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.सदर प्रात्यक्षिकाच्या यशस्वितेसाठी विद्यार्थ्याला स्वा. वी. ग. इंगळे कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई,कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश आटोळे,कार्यक्रम समन्वयक प्रा. विद्या कपले व विषय तज्ज्ञ प्रा. प्रमोद ढवळे यांचे मार्गदर्शन लाभले.