Home मराठवाडा वनहक्कांना कायदेशीर मान्य करण्याबरोबरच त्यांच्यात जंगलातील जैवविविधता संरक्षणासंबंधी कर्तव्याची जाणीव निर्माण करावी...

वनहक्कांना कायदेशीर मान्य करण्याबरोबरच त्यांच्यात जंगलातील जैवविविधता संरक्षणासंबंधी कर्तव्याची जाणीव निर्माण करावी – सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार, भाप्रसे

52
0

मजहर शेख, नांदेड

नांदेड/किनवट, दि. ०३ :- आदिवासी व पारंपारिकरित्या वनांवर किंवा वनजमिनीवर खर्‍याखुर्‍या गरजांसाठी किंवा उपजीविकेसाठी अवलंबून असणाऱ्या इतर पारंपारिक वननिवासी समूहांवरील ऐतिहासिक अन्याय दूर करावा, वनहक्कांना कायदेशीर मान्य करण्याबरोबरच त्यांच्यात जंगलातील जैवविविधता संरक्षणासंबंधी कर्तव्याची जाणीव निर्माण करावे, सामुहिक वन हक्क मान्यता प्राप्त झालेल्या ग्रामसभामार्फत लोकसहभाग व विविध शासकीय विभागाच्या लाभ आणि योजनांना एककेंद्राभिमुख करून सामूहिक वन हक्काचे व जंगलाचे संरक्षण, संवर्धन, वापर, पुनर्निर्माण व व्यवस्थापन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी व वनहक्क उपविभाग स्तरीय समिती अध्यक्ष कीर्तीकिरण एच. पूजार, भाप्रसे यांनी केले.
येथील पंचायत समिती सभागृहात उप विभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘ अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी ( वन हक्काची मान्यता ) अधिनियम 2006, 2008, 2012 ) ” या विषयावर आयोजित कार्यशाळेत अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत.
याप्रसंगी आमदार भीमराव केराम उद्घाटन करतांना म्हणाले की, अनेक हालअपेष्टा सहन करत जंगल जमिनीवर उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी,वननिवासी दावेदारास विनाविलंब वनहक्क प्राप्त करून याद्वारे त्यांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यासाठी सहकार्य करावे.
यावेळी तहसिलदार उत्तम कागणे, पंचायत समिती सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, सदस्य निळकंठ कातले, माधवराव डोखळे, गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समन्वयक के.एम. पटणे व संगणक परिचालक कविराज येरेकार यांच्या सहकार्याने मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी पॉवर पॉईंट प्रझेंटेशनद्वारे कार्यशाळेत वनहक्क कायद्याची ईत्यंभूत माहिती दिली.
कार्यशाळेस नायब तहसिलदार सर्वेश मेश्राम, वन परिक्षेत्राधिकारी किशन खंदारे आदिंसह तालुक्यातील सर्व वनहक्क समिती अध्यक्ष, तलाठी, ग्रामसेवक, वनरक्षक, महसूल व वन विभागाचे अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी नायब तहसिलदार मोहम्मद रफीक, राजेश मॅकलवार, धनराज, वसंत राठोड यांनी परिश्रम घेतले.