Home विदर्भ हाथरस येथील अत्याचार व खुन प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या . शक्ती...

हाथरस येथील अत्याचार व खुन प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या . शक्ती फाऊंडेशनची मागणी

181

यवतमाळ –  उत्तर प्रदेशातील हाथरस या गावी सामूहिक बलात्कार आणि हत्त्या झालेल्या वाल्मीकी जातीच्या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा व आरोपी नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी शक्ती फाऊंडेशन यवतमाळच्या वतिने अध्यक्ष प्रियंका बिडकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती, देशाचे पंतप्रधान यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. दि.14 सप्टेंबर 2020 रोजी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका 19 वर्षाच्या वाल्मिकी जातीच्या शेतमजूर तरुणीवर उच्चवर्णिय जातीच्या चार नराधमांनी निर्दयपणे सामुदायिक बलात्कार केला.नंतर त्याही पुढे जाऊन अतिशय विकृतपणे तिचे हाल हाल केले.तिची जीभ तोडली.तिचे कंबरडे मोडले.ती रक्ताच्या थारोळ्यात पडली.तरीही पोलिसांनी तब्बल पाच दिवस एफ.आय.आर नोंदवला नाही. तिला तातडीची वैद्यकीय मदत आवश्यक असूनही ती देण्यात आली नाही.शक्य असूनही तिचे प्राण वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही.इतकेच नव्हे,तर पोलिसांनी तिचे मृतदेह तिच्या कुटुंबियांना न देता त्याची परस्पर विल्हेवाट लावली.त्यामुळेच त्या राज्यात मागासवर्गीय आणि महिलांवरील अत्याचारात भयानक वाढ झाली आहे.बलात्कार आणि खून करणार्‍या नराधम गुन्हेगारांसोबतच एफआयआर नोंदवण्यास नकार देणार्‍या, तसेच त्या दुर्दैवी मुलीच्या मृतदेहावर क्रूरपणे आणि जबरदस्तीने दहन करणार्‍या पोलिसांवर देखील कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रियंका बिडकर, उपाध्यक्ष वर्षा मानवतकर, सचिव अनिता वर्‍हाडे, विद्याताई मडावी, रविता भोवते, अंजूताई चिंरोलकर, मेजर जाधव, उरकुडेताई, राजश्री मानकर, पायल मनवर आदि उपस्थित होते