Home विदर्भ हाथरस येथिल प्रकरणाचा पारवा येथे निषेध , युवक काँग्रेस पारवा सर्कल तर्फे...

हाथरस येथिल प्रकरणाचा पारवा येथे निषेध , युवक काँग्रेस पारवा सर्कल तर्फे निषेध…!

127

यवतमाळ / घाटंजी – उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे दिनांक १४ सप्टेंबर २०२०रोजी मनीषा वाल्मिकी या तरुणीवर काही नराधम गुन्हेगारांनी सामूहिक बलात्कार करून तिच्या शरीराची अवहेलना केली. पीडित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पिडीत कुटुंबीयांना भेटण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहूल गांधी व सोनिया गांधी गेले असता भेटणे तर सोडा चक्क उत्तर प्रदेश पोलिसांनी पिडीत कुटुंबा पर्यंत जाण्यास मनाई करून धक्का बुक्की करीत बेकायदेशीर अटक केल्याने संतप्त झालेल्या पारवा सर्कल मधील युवक काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी मोदी व योगी हाय हाय करीत पारवा चौफुलीवर ३ ऑक्टोंबर ला निषेध नोंदवून धरणे आंदोलन करण्यात आले.

हाथरस प्रकरणातील नराधमाना फाशीची शिक्षा द्यावी व काँग्रेस नेते खा. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्यावर घडलेल्या अन्यायकारक बाबीला घेवून अनेक घोषणा बाजी करण्यात आली.यावेळी गणेश भाऊ मुद्दलवार, मोहन बद्दीवार, आकाश आत्राम, आकाश गोहाडे, पवन अडसपुरे, रुपेश बोमिनवार, अबरार शेख, राहुल आत्राम, सादीक भाई, रमेश पालीवार यासह युवक कॉंग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.

घाटंजी -उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे दिनांक १४ सप्टेंबर २०२०रोजी मनीषा वाल्मिकी या तरुणीवर काही नराधम गुन्हेगारांनी सामूहिक बलात्कार करून तिच्या शरीराची अवहेलना केली. पीडित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पिडीत कुटुंबीयांना भेटण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहूल गांधी व सोनिया गांधी गेले असता भेटणे तर सोडा चक्क उत्तर प्रदेश पोलिसांनी पिडीत कुटुंबा पर्यंत जाण्यास मनाई करून धक्का बुक्की करीत बेकायदेशीर अटक केल्याने संतप्त झालेल्या पारवा सर्कल मधील युवक काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी मोदी व योगी हाय हाय करीत पारवा चौफुलीवर ३ ऑक्टोंबर ला निषेध नोंदवून धरणे आंदोलन करण्यात आले.