Home जळगाव उत्तर प्रदेश येथिल दलित मुलिवर सामुहिक बलात्कार करणा-यावर कठोर कार्यवाही साठी निळे...

उत्तर प्रदेश येथिल दलित मुलिवर सामुहिक बलात्कार करणा-यावर कठोर कार्यवाही साठी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने जाहिर निषेध

53
0

रावेर (शरीफ शेख)

उत्तर प्रदेश येथिल दलित मुलिवर सामुहिक बलात्कार करणा-यावर कठोर कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने जाहिर निषेध करुन मा. तहसिलदार व मा. पोलिस निरिक्षक याना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, उत्तर प्रदेश येथिल मणिषा वल्मिकी या दलीत समाजाच्या मुलीवर काही नराधमानी सामुहीक बलात्कार केलेला असुन त्यामध्ये तीचा मृत्यु झालेला आहे. उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार असुन उत्तत प्रदेशातील महीला असुरक्षीत आहेत दिवसें- दिवस महिलांवर अन्याय – अत्याचाराच्या घटना घडत असतांना उ. प्र. सरकार्मध्ये मात्र ह्या बाबत गांभिर्य पाहिजे तसे दिसत नसल्याने मा. राष्ट्रपती यांनी उ. प्र. सरकार बरखास्त करावे नाहीतर उ.प्र. मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा मणिषा वाल्मिकी ही सामुहीक बलात्कारात मृत्युमुखी झाल्यावर तिच्या अंत्यविधीला तिच्या परीवारातील लोकांना घरांमध्ये कोंबुन ठेवण्यात आले. त्यांना हात सुद्धा लावु दिला नाही. उ. प्र. सरकार ही आरोपिंना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी भाजपा सरकारच्या बद्दल दलीत समाजाचा रोष वाढतच आहे. या घतनेची CBI चौकशी होवुन अरोपिंना फ़ाशिची शिक्षा व्हावी आणी महिलांवरील अन्याय अत्याचा-याचा घटना थांबवाव्या अन्यथा आंबेडकरी समाज, निळे निशाण सामाजीक संघटना रस्त्यावर उतरुण अशा क्रुर वृत्ती चा लोकशाही मार्गाणे आंदोलने मोर्चे काढुन रस्त्यावर उतरेल व याला सर्वस्वी भाजपाचे केंद्र सरकार व उ.प्र. राज्य सरकार जाबाबदार राहील . यांची नोंद घ्यावी.

निवेदनावर निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर ,कार्याध्यक्ष राजुभाऊ सवर्णे,सरचिटणीस उमेशभाऊ गाढे,उपाध्यक्ष संघरक्षक तायडे,पंकज वाघ, सचिव सावनभाऊ मेढे,महासचिव संतोषभाऊ कोसोदे, महेशभाऊ तायडे,ता. अध्यक्ष सुनिल भाऊ हंसकर ,सदाशीव निकम,जितेंद्र ढिवरे,जितेंद्र साबळे,आकाश शीरतुरे,सुजल छपरीबंद,प्रथम जावे,सुमित हंसकर, नरेंद्र जावे,अजय छपरीबंद,करण छपरीबंद, आदींच्या निवेदनावर सहया आहे.