Home महत्वाची बातमी पत्नी ला वाचविण्यासाठी पती गेला अन तो ही ????

पत्नी ला वाचविण्यासाठी पती गेला अन तो ही ????

595
0

पत्नी ला वाचविण्यासाठी पती गेला अन तो ही ????

दुःखद घटना

अमीन शाह

बुलडाणा ,

नुकताच लग्न झालेल्या नवविवाहित जोडप्याचा चिखली तालुक्यातील सोनेवाडी शिवारात विहिरीत पडून मृत्यू झाला . सोनेवाडी येथील शांताराम देविदास राखोंडे ( 22 ) , आरती शांताराम राखोडे ( 19 ) असे मृत्यू झालेल्या जोडप्याचे नाव आहे . पती – पत्नी येवता येथील शिवारातील विष्णू बंगाळे यांच्या शेतामध्ये सोयाबीन सोंगण्याकरिता गेले होते . दुपारच्यावेळेस जेवण करत असताना विहीरीवर पाणी आणण्याकरिता गेलेली पत्नी आरती लवकर न आल्यामुळे विहिरीवर जाऊन बघितले असता पत्नी अचानक पाय घसरून पडलेली दिसताच पती शांताराम याने तिला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली . मात्र वाचवण्याचा प्रयत्न करताना त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला . लॉकडाऊनमध्ये दोघांचे लग्न झाले होते . या घटनेमुळे सोनेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . चिखली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे . पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय श्री . शिंदे तपास करत आहेत .