Home जळगाव उत्तर प्रदेश येथिल दलित मुलिवर सामुहिक बलात्कार करणा-यावर कठोर कार्यवाही साठी वंचित...

उत्तर प्रदेश येथिल दलित मुलिवर सामुहिक बलात्कार करणा-यावर कठोर कार्यवाही साठी वंचित बहुजन आघाडी रावेर तालुक्याच्या वतीने जाहिर निषेध.

117

रावेर (शरीफ शेख) 

उत्तर प्रदेश येथिल मणिषा वल्मिकी या दलीत समाजाच्या मुलीवर काही नराधमानी सामुहीक बलात्कार करुन तिची जिभ कापून टाकल्या नंतर त्यामध्ये तीचा मृत्यु झालेला आहे. उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार असुन उत्तर प्रदेशातील महीला असुरक्षीत आहेत दिवसें- दिवस महिलांवर अन्याय – अत्याचाराच्या घटना घडत असतांना उत्तर प्रदेश सरकार्मध्ये मात्र ह्या बाबत गांभिर्य पाहिजे तसे दिसत नसल्याने मा. राष्ट्रपती यांनी उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करावे. नाहीतर उत्तर प्रदेश मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा मणिषा वाल्मिकी ही सामुहीक बलात्कारात मृत्युमुखी झाल्यावर तिच्या अंत्यविधीला तिच्या परीवारातील लोकांना घरांमध्ये कोंबुन ठेवण्यात आले. प्रेताला हात सुद्धा लावु दिला नाही. पोलिसानी रातोरात प्रेत जाळुन पुरावा नष्ट केलेला आहे. उत्तर प्रदेश सरकार ही आरोपिंना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे.मयत व्यक्तीच्या कुटुंबाला 1 कोटीची मदत व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी.अशा मागणीचे निवेदन मा.तहसिलदार उषाराणी देवगुणे,मा. पो.नि.रामदास वाकोडे यांना देण्यात आले.

उत्तर प्रदेश मधील भाजपा सरकारच्या बद्दल दलीत समाजाचा मध्ये व बहुजन समाजामध्ये रोष वाढतच आहे. या घतनेची CBI चौकशी होऊन आरोपिंना फ़ाशिची शिक्षा व्हावी आणी महिलांवरील अन्याय अत्याचा-याचा घटना थांबवाव्या अन्यथा वंचित बहुजन आघाडी लोकशाही मार्गाणे आंदोलने मोर्चे काढुन रस्त्यावर उतरेल व याला सर्वस्वी भाजपाचे केंद्र सरकार व उत्तर प्रदेश राज्य सरकार जाबाबदार राहील . यांची केंद्र सरकारने व उत्तर प्रदेश सरकारने नोंद घ्यावी.

निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे रावेर ता.अध्यक्ष बाळू राजाराम शिरतुरे, जि.उपाध्यक्ष रफीक बेग रशीद बेग, बाळा शिरतुरे, अर्जुन वाघ, विनोद तायडे, सलीम शाह यासिम शाह, सचिन तायडे,रामदास भालेराव, सुनिल तायडे, अशोक कोचुरे, रविंद्र तायडे, संघरत्न शिरतुरे, रमेश सोनवणे, नितीन तायडे, दिलीप पानपाटील, कैलास धनगर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.