Home मराठवाडा गांधी जयंती निमित्त विरेगव्हाण तांड्यात युवकांनी राबविली स्वच्छता मोहीम

गांधी जयंती निमित्त विरेगव्हाण तांड्यात युवकांनी राबविली स्वच्छता मोहीम

249

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना – जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्तचे औचित्य साधून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.येथील तरूण तांडा परिवर्तन साठी नेहमीच प्रयत्न शील असतात.नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता खुप महत्वाची आहे.कुठल्याही राजकीय मदतीची अपेक्षा न ठेवता स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल राठोड, राधेश्याम राठोड,कृष्णा राठोड आदींनी सहभाग घेतला.विरेगव्हाण तांड्यातील रस्ते ,नाल्यांची साफसफाई केली.या तरूणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.