Home मराठवाडा शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला -दत्ता सुरूंग

शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला -दत्ता सुरूंग

124

परतूर/प्रतिनिधी- परतूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.शेत जमिनीत उगवलेले पीक कमी आणि पाणीच जास्त दिसत आहे.यामुळे शेतकरी चिंतेत आहे. अगोदर फेडलेल्या कर्जाचा डोंगर पुन्हा डोक्यावर आला आहे.बी-बियाणे याचा खर्च निघणार नाही.शेतकरी माय-बापच्या तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे.कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी तर कधी महापूर अशा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आत्महत्या करण्याच्या स्थितीत आला आहे.शेतामध्ये राब-राबणारा बळीराजा जीवाची पर्वा न करता काम करत आहे.शेवटी अशी परिस्थिती आल्यावर कठीण आहे. यावर्षी शेतात कापूस ,सोयाबीन, तूर, भुईमूग, ऊस हे पिके चांगली आली होती.परंतु अवकाळी पावसामुळे ही पिके वाया जाण्याची शक्यता आहे.शेतात पाणी साचल्याने पिकांची नासाडी झाली आहे.
या प्रकरणी ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम, जिल्हा संघटक मोहन अग्रवाल,तालुकाप्रमुख अशोकराव आघाव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पालकमंत्री राजेश टोपे यांची लवकरच भेट घेणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख दत्ता सुरूंग यांनी दिली.