Home मराठवाडा स्वनिधी योजनेच्या कर्ज वाटपासाठी बँकेचा नकारघंटा   स्टेट बँकेने केले 47 लाभर्थ्यांना कर्ज वाटप

स्वनिधी योजनेच्या कर्ज वाटपासाठी बँकेचा नकारघंटा   स्टेट बँकेने केले 47 लाभर्थ्यांना कर्ज वाटप

58
0

रस्त्यावर उतरूण अंदोलन छेडणार – मा.उपनगराध्यक्ष अकील काजी ,
अथर शेख

परतुर – प्रतिनिधी

कोरोणाच्या या महासंकटात छोटया व्यापा-याना पून्हा त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी शासनाने महत्वकांक्षी स्वनिधी कर्ज योजना जाहिर केली. मात्र येथील भारतीय स्टेट बँक वगळता इतर बँकांनी लाभर्थ्यांना कर्ज देत नसल्याने बँकेच्या नकारघंटामुळे लाभर्थ्यांचे प्रस्ताव रेंगाळत असल्याने ते तत्काळ मार्गी लावण्याची मागणी राष्ट्रवादी कोंग्रेस शहरच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की स्वनिधी योजनेचे अर्ज कर्ज प्रकारणाबाबत पालीकेत तब्बल दोन हजार अर्ज असतांना केवळ स्टेट बॅकेने 47 प्रकरणेचं मंजुर केले आहेत. मात्र शहरातील क्यानरा बँक, अक्सीस बँक, आय सी आय ,सी आय, बँक ऑफ महाराष्ट्र , महाराष्ट्र ग्रामीण बँक , या बँक कर्जाचे अर्ज स्वीकारत नाही. बॅकेच्या नाकर्तेपणामुळे अनेक कर्ज प्रकरणे रेगांळत पडले आहे. सदरील कर्ज योजना ही हातगाडे वाले, भाजीपाला विक्रते व किरकोळ व्यापा-यासाठी लागु आहे. लॉकडाउनमुळे अशा व्यापा-याचे सर्व व्यवहार ढप्प झाले आहेत व  त्यांच्या कुटुबांवर उपासमारीची वेळ येउन ठेपली आहे फेरीवाले व्यापारी यांना त्याच्या पायावर उभे राहता यावे भावनेने शासनाने हि योजना चालु केली. सर्व बॅकेमार्फत अशाना कर्ज पुरवठा करण्याचे आदेश असतांना येथील स्टेट बॅकेने वगळता. ईतर बॅकेंनी सरकारच्या या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
प्रशासनाने याकडे लक्ष घालून लाभर्थ्यांना कर्ज वाटपाचे बँकांना आदेश देऊन तात्काळ कर्ज वाटप करावे नसता. रस्त्यावर उतरूण राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांच्या नेतृत्वाखाली अंदोलन छेडण्याचा ईशारा माजी उपनगराध्यक्ष अखिल काजी , नगरसेवक शाम तेलगड, कोंग्रेसचे शहराध्यक्ष वैजनाथ बागल यांनी दिला आहे.