Home जळगाव बिरादरी वादला फाटा देत साकारले दोन घटस्फोटिता चे “निकाह”

बिरादरी वादला फाटा देत साकारले दोन घटस्फोटिता चे “निकाह”

125

मनियार-खान व पटेल बिरादरी चा स्तुत्य उपक्रम

रावेर (शरीफ शेख)
जळगाव मनियार वाड्यातील घटस्फोटिता नजमा बी शेख हुसेन व सुरत येथील घटस्फोटित अन्वर खान हसन खान पठाण या दोघांचे नीकाह (विवाह) रविवारी जळगाव येथील जामा मस्जिद मध्ये मौलाना रेहान बागवान यांनी निकाह ( विवाह) लावण्यात आला.

विवाह प्रसंगी नजमा बी कडून वकिलाची भूमिका मनियार बिरादरीचे शहराध्यक्ष सय्यद चाँद सय्यद अमीर, यांनी तर अन्वर खान यांच्यातर्फे साक्षीदार म्हणून जळगाव सुप्रीम कॉलनी मधील कुर्बान नथु पटेल व शकील पटेल यांनी पारपाडली . मौलाना रेहान बागवान
यांच्या दुवा ने हा विवाह सोहळा अत्यंत मोजक्या लोकांमध्ये पार पडला.

*सकारात्मक बातमी*
रविवारी सर्व वर्तमान पत्रात मुस्लिम समाजातील एक व्यक्ती ने इस्लाम विरोधी कृत्य केले व एकाच वेळी आपल्या पत्नीस तीन तलाक दिले म्हणून पत्नीने पती विरुद्ध शनी पेठ पो स्टे गुन्हा दाखल केला आहे. त्याच वेळी ही आजची सकारात्मक बातमी समाजाला एक दिशा देणारी ठरली.

*बिरादरी वादला फाटा*

सुरत चे अन्वर खान हसन खान पठाण हे खान बिरदारीचे याची बहिण जळगाव येथे शकील रउफ पटेल म्हणजे पटेल बिरादरी ची यांच्याकडे संसार करत असून अनवर खान यांचा घटस्पोट झाल्याने ते जळगाव येथे चालक म्हणून नौकरी करीत आहे.

जळगाव पिंप्राळा हुडको तील रिश्ते नाते करणारे अयाज शेख यांच्या निदर्शनास नजमा बी चे वडील शेख हुसेन यांनी पुनर्विवाह साठी मुलगा असल्यास सांगावे असा प्रस्ताव दिल्याने पठाण बिरादरी चे वर , मनियार बिरादरी ची वधू व पटेल बिरदारीचे सासरवाडी यांच्यात कोणत्याही प्रकारे बिरादरी वाद न येता सदरचा विवाह सोहळा पार पडला.

*यांची होती उपस्थिती*

या छोटेखानी परंतु ऐतिहासिक विवाहसमारंभाला मननियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, सह पटेल बिरादरीचे रहीम निसार पटेल, शकील पटेल, कुरबान नथू पटेल, मन्यार बिरादरीचे ताहेर शेख, सलीम मोहम्मद, अब्दुल रऊफ, अल्ताफ शेख, सादिक शेख ,डॉक्टर ताहेर शेख, अय्युब फकीरा ,जावेद चंनीवाले, शेख गुलाम मिस्तरी तर सिकलिगर बिरादरीचे समशेर खान यांची उपस्थिती होती.
*कोणतीही जेवणावळी नाही की मान अपमान नाही*
निकाह लागताच नव वधू नजमा बी हिला मानियार वाड्यातून बिदागरी देऊन सुप्रीम कॉलोनी जळगाव येथे रवाना करण्यात आले. कोणतेही प्रकारची जेवणावणी सुद्धा झाली नाही.