Home विदर्भ धामणगाव तालुक्यातील चंद्रभागा नदीत बुडून तीन चिमुकल्यांना जलसमाधी

धामणगाव तालुक्यातील चंद्रभागा नदीत बुडून तीन चिमुकल्यांना जलसमाधी

142

तीन महिला गंभीर ; एकीचा वाटेतच मृत्यू निंबोरा राज येथील घटना

प्रशांत नाईक

अमरावती – जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील गावाशेजारी असलेल्या चंद्रभागा नदीत कुटुंबासह आंघोळ व पूजेसाठी गेलेल्या तीन चिमुकल्यांना जलसमाधी मिळाली . तर तीन महिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.नुकत्याच हाती आलेल्या बातमी नुसार उपचारासाठी जात असलेल्या महिलांपैकी पुष्पा दिलीप चवरे हिचे रस्त्यात निधन झाले आहे.
यश प्रमोद चवरे, वय ११ वय , जीवन प्रदीप चवरे वय १५ वर्ष ,सोहम दिनेश झेले १२ वर्ष असे मृतक चिमुकल्यांचे नाव असून बेबी प्रदिप चवरे वय ३५वर्ष, पुष्पा दिलीप चवरे वय ३२ वर्ष, राधा गोपाळराव मलीये वय ३८ वर्ष अशा प्रकृती चिंताजनक असलेल्या महिलांचे नाव असून हे सर्व धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा राज या गावातील रहिवासी आहे सध्या अधिक मास असल्यामुळे बेलदार परिवारातील हे कुटुंबीय हा सकाळी सहा वाजता दरम्यान आंघोळ व पूजा करण्यासाठी गावाशेजारी असलेल्या चंद्रभागा नदी येथे गेले होते. मृतक जीवन प्रदीप हा आपल्या आई बेबी सोबत गेला होता मृतक जीवन हा धामणगाव येथील से फ ला हायस्कूल स्कूल मध्ये यंदा दहावी वर्गात शिकत होता जीवन ची आई बेबीची प्रकृती चिंताजनक आहे. मृतक यश हा याच हायस्कूलमध्ये सहावीत शिक्षण घेत होता तर सोहम गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गात शिक्षण घेत होता जखमी पुष्पा ही येथील पोलीस पाटील दिलीप चवरे यांची पत्नी आहे.