Home महाराष्ट्र त्याच्या सोबत लग्न करून सुखी संसाराची स्वप्ने पाहत होती ती ???

त्याच्या सोबत लग्न करून सुखी संसाराची स्वप्ने पाहत होती ती ???

368
0

 

अमीन शाह ,

एका मॅट्रिमोनी साईटवरून ओळख झालेल्या तरुणाने विवाह करण्यास इच्छुक असलेल्या तरुणीस तब्बल साडेपाच लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे .जोडीदाराच्या शोधात असताना विवाह संकेतस्थळावरून तरुणासोबत ओळख झाली. संवाद वाढल्यानंतर लग्नाचे स्वप्न रंगवण्यात मुलीची सुरुवात झाली मात्र लग्नापूर्वीच होणारा नवरदेव साडेपाच लाखांचा गंडा घालून नॉटरिचेबल झाल्याने तरुणीला पोलीस ठाणे गाठण्याची वेळ आली
उपलब्ध माहितीनुसार, गिरगाव परिसरात 36 वर्षीय रेश्मा ( बदललेले नाव ) आई सोबत राहते. जून महिन्यात लग्नासाठी विवाह संकेतस्थळावर तिने आपली माहिती शेअर केली त्यानंतर तिला मुलांच्या रिक्वेस्ट येत असताना 4 सप्टेंबर रोजी एकाचा व्हाट्सअप संदेश आला. त्याने त्याचे नाव संदीप राऊत असल्याचे सांगून वाराणसीचा रहिवासी असल्याचे सांगितले तसेच अमेरिकेत त्याची स्वतःची कंपनी असल्याचे देखील सांगत होता
दोघांमध्ये संवाद वाढला तसे रेशमानेही त्याच्यासोबत लग्नाची स्वप्नं रंगवली. सात सप्टेंबर रोजी त्याने 57000 रुपयांच्या वस्तू खरेदी केल्याचे सांगितले आणि त्या कार्गोने पाठवत असल्याचे सांगून लिंक देखील पाठवली तसेच सोबत खरेदी केलेल्या गिफ्टचे फोटोही पाठवले. त्यानंतर कुरियर कंपनीचा मेल धडकला. आठ तारखेला कुरियर आल्याचे सांगून त्यासाठी 57000 रुपये भरण्यास सांगितले त्यानुसार तिने पैसे भरले. पुढे दुसरा कॉल आला त्यामध्ये पार्सल मध्ये पैसे असल्याचे सांगून आणखीन दीड लाख भरण्यास सांगितले.

त्यानंतर वेगवेगळी कारणे देत तरुणीकडून ५ लाख 64000 रुपये उकळले पण पुढे आणखी नऊ लाख भरावे लागणार असल्याचे सांगितले. संदीपला तिने पैसे नसल्याचे सांगतात त्याने विवाह संकेतस्थळावरील त्याचे अकाउंट डिलीट करण्यास सांगितले. तरुणीने भरलेल्या पैशांबाबत विचारणा करताच त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्याने त्याचा मोबाईल बंद करून टाकला.

वेळोवेळी प्रयत्न करूनही त्याचा फोन सातत्याने नॉटरिचेबल येत असल्याने आपली फसवणूक झाल्याची तरुणीची खात्री झाली त्यानंतर तिने पोलिसात जाऊन आपली तक्रार नोंदवून त्यानुसार शनिवारी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे समजते. मॅट्रिमोनी साईटवर देखील खोटे प्रोफाइल बनवून लोकांना गंडवणे सोपे जात असल्याने यापुढे अशा साईटवर भेटणाऱ्या लोकांवर सहज विश्वास टाकून आर्थिक व्यवहार टाळण्याची गरज आहे .