Home मराठवाडा लॉक डाऊननंतर बाजार भरला….. मोबाईल चोर सक्रिय…..

लॉक डाऊननंतर बाजार भरला….. मोबाईल चोर सक्रिय…..

56
0

रंगेहात पकडून नागरिकांकडून चोप….
पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी….

 

शेख अथर

परतुर /प्रतिनिधी

येथील शनिवार आठवडी बाजारातुन नागरीकांचा मोबाईल चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय होत्या मात्र कोरोनाच्या या काळात गर्दी जमवू नये म्हणून पालिका प्रशासनाने आठवडी बाजार बंद केला होता मात्र जसाच आठवडी बाजार भरण्यास सुरुवात झाली की पुन्हा मोबाईल चोरांची टोळी सक्रिय झाली असल्याचे चित्र परतूर शहरात दिसून येत आहे.
झाले असे की दिनांक 26 सप्टेंबर रोजी बाजार भरला यात अनेक जणांचे मोबाईल चोरी गेल्याने शोधा शोध सुरू झाली असता या पैकी एक चोरटा मोबाईल चोरतांना नागरीकांनी रंगेहात पकडुन त्यांची चांगलीचं धुलाई केली. व त्याला पोलीसांच्या हवाली केले. याच वेळी बाजारात खरेदी करण्यासाठी आलेले दै.सामनाचे प्रतिनिधी राजकुमार भारूका यांचाही ओपो कंपनीचा 17 हजार रूपये किमंतीचा मोबाईल या टोळी मधील एकाने चोरला असुन याबाबत परतुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून. तसेच सुभाष पाटोदकर यांचा मोबाईल चोरतांना रंगेहात पकडलेला चोरटयाला पोलीसांनी ताब्यात घेतले असुन. त्याच्या विरोधात 379 भा द वी ने गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपनिरीक्षक बालासाहेब जाधव करीत आहेत. टोळीतील अन्य जण पसार झाले असुन त्याचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. आठवडी बाजरात मोबाईल, महिलांची पैशाची पर्स, नागरीकांचे पेसे चोरल्याच्या घटना अनेक वेळा घडत असुन पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

★★★★चौकट★★★★

*चोरट्यांचा बंदोबस्त करावा….*

आठवडी बाजारात शहर व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक बाजारात येतात यात महिलांची संख्या पाहता बाजार स्थळ येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा जेणे करून खिसेकापू,मोबाईल चोर यांच्यावर अंकुश ठेवता येईल.
म्हणून पोलीस प्रशासनाने अश्या घटना होऊ नये म्हणून पावले उचलुन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव इब्राहिम कायमखानी यांनी ‘पोलिसवाला’शी बोलतांना केली.