Home जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर इमरान पठाणचे कोरणा योद्धा म्हणून गौरव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर इमरान पठाणचे कोरणा योद्धा म्हणून गौरव

136
0

जळगाव कोविड केयर युनिटचा स्तुत्य उपक्रम….!

रावेर (शरीफ शेख)
जळगाव – शहरातील ३३ सामाजिक संघटना यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या जळगाव कोविंड केअर युनिट च्या माध्यमाने कौटुंबिक सर्वेक्षण, वैद्यकीय शिबिर, मोफत औषधी वाटप, मोफत एक्स-रे , व आता माझे कुटुंब व माझी जवाबदारी हे कार्य करीत असून त्या सोबत इतर कार्य या कोरोना महामारी मध्ये केली जात आहे.
यामध्ये जे डॉक्टर अथवा सुरक्षा कर्मचारी जे खरोखरच कोरोना योध्दा सारखे या महामारी मध्ये कार्यरत आहे अशा कोरोना युद्धांचा त्यांच्या घरी अथवा त्यांच्या कार्यस्थळी जाऊन त्यांना शाल, श्रीफळ सह स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहेत
” डॉक्टर इमरान पठाण ” शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अर्थातच कोविड हॉस्पिटल मधील प्रत्येक स्टाफ, डॉक्टर हे आपले कर्तव्य पार पाडीत आहेत असेच एक डॉक्टर मागील पाच महिन्यापासून सुट्टी न उपभोगता कुटुंबाशी दूर राहून ,कोरोना रुग्णा सोबत राहून त्यांची सेवा करीत आहेत असे डॉक्टर इमरान पठाण यांचा आज जळगाव कोविड केअर युनिट तर्फे युवाशक्तीचे अमित जगताप यांच्या हस्ते गौरव करण्यात आले त्यावेळी युनिटचे समन्वयक फारुक शेख, नोंदणी विभाग प्रमुख आमीर शेख,औषध वितरण चे वसीम शेख अन्वर सिकलिगर यांच्या उपस्थितीत डॉक्टर इमरान पठाण यांचे गौरव करण्यात आले.

डॉक्टर इमरान पठाण हे जळगाव कोविड केअर युनिट सोबत पहिल्या दिवसापासून परिचित असून ते आमच्या सूचनांनुसार आवश्यक ते सहकार्य करीत आहेत.
त्यांच्या कार्याची दखल दै दिव्य मराठीने घेतल्याने कोविड केअर युनिट चे फारूक शेख यांनी त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष प्रार्थना करून त्यांचे गौरव केले.