Home विदर्भ घरफोडी , चोरी करणारी टोळी गजाआड , “२४ गुन्हे उघडकीस” , ५...

घरफोडी , चोरी करणारी टोळी गजाआड , “२४ गुन्हे उघडकीस” , ५ लाख २१ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त….!

139
0

रवि माळवी

स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई

यवतमाळ , दि. २६ :- चोरट्यांनी चोरी केलेले सोयाबीन, तुर, चना असे धान्य विक्री करण्यासाठी टांगा चौक यवतमाळ येथे आले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना सापळा रचून अटक केली. पोलीसांनी ही कारवाई दिनांक २४ सप्टेंबर रोजी केली.
सैय्यद जुबेर सैय्यद ताहेर रा. आर्णी, लल्ला उर्फ ललित चव्हाण रा. दिग्रस, सैय्यद मुबारक सैय्यद मुजफ्फर रा. दारव्हा, शेख समीर शेख रहीम रा. दारव्हा असे पोलीसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दिनांक २४ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ येथील पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार व त्यांचे पथक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथे हजर असतांना त्यांना गोपणीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की दारव्हा पोलीस स्टेशन मध्ये अप. क्र. ६७१/१९ भादंवि कलम ४६१ , ३८० च्या गुन्ह्यात पाहीजे असलेले आरोपींमधील दोघेजण हे यवतमाळ येथील टांगा चौकत आलेले असतांना पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार व त्यांचे पथकातील कर्मचारी यांनी टांगा चौक यवतमाळ येथे सापळा रचुन आरोपी सैय्यद जुबेर सैय्यद ताहेर रा. आर्णी व लल्ला उर्फ ललित चव्हाण रा. दिग्रस यांना ताब्यात घेतले.
पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार व त्यांचे पथकाने नमुद दोन्ही आरोपीतांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता दोन्ही आरोपींनी त्यांचे साथीदार सैय्यद मुबारक सैय्यद मुजफ्फर रा. दारव्हा, शेख समीर शेख रहीम रा. दारव्हा यांचेसह मिळुन आर्णी, दिग्रस, दारव्हा, पारवा, लाडखेड परिसरात किराणा दुकान , गोदाम फोडून अन्नधान्य व किराणा माल चोरी केल्याचे सांगीतल्याने आरोपी सैय्यद मुबारक सैय्यद मुजफ्फर व शेख समीर शेख रहीम यांना दारव्हा येथून ताब्यात घेवून नमुद चारही आरोपीतांकडून आर्णी पोलीस स्टेशन येथील १२, दिग्रस पोलीस स्टेशन येथील ५, दारव्हा पोलीस स्टेशन येथील ४, पारवा पोलीस स्टेशन येथील २, लाडखेड पोलीस स्टेशन येथील १ असे एकुण २४ चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणुन ५ लाख २१ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला असून नमुद चारही आरेपीतांना पुढील कार्यवाही कामी दारव्हा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी यवतमाळ चे पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ , अपर पोलीस अधिक्षक नूरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार, विशाल भगत, सुरेंद्र वाकोडे, जुनेद, सुधीर पिदुरकर, यशवंत जाधव सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी पार पाडली.