Home विदर्भ ★’दमदार विद्यार्थी वक्ता महाराष्ट्राचा’ राज्यस्तरीय ओनलाईन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद……

★’दमदार विद्यार्थी वक्ता महाराष्ट्राचा’ राज्यस्तरीय ओनलाईन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद……

81
0

कोण ठरणार वक्ता महाराष्ट्राचा? बालवाक्पटुसह सर्वांची उत्कंठा शिगेला…..

यवतमाळ / घाटंजी , दि.२६ :-  यवतमाळ जिल्ह्ला परिषद प्रा.शिक्षक संघ रंनं.२३५ यांच्यावतीने आयोजित विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा तसेच उपक्रमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी ‘दमदार विद्यार्थी वक्ता महाराष्ट्राचा’ ह्या राज्यस्तरीय ओनलाईन वक्तृत्व स्पर्धैला धडाक्यात सुरुवात झाली.कोरोना काळात संपूर्ण देश घरात असला तरी वर्ग १ते ८ च्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी देत भरघोस बक्षिसासह ओनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे भव्य व्यासपिठ संघटनेचे कार्याध्यक्ष श्री.राजुदासजी जाधव सरांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात आले.
लाँकडाउन काळातील शिक्षण,लाँकडाउन काळातील समाजजीवन,खरे कोरोना योद्धे व आत्मनिर्भर भारत ह्या दिलेल्या चार विषयानुषंगान इंग्रजी, मराठी व हिंदी ह्या तिन्ही भाषेत असलेल्या ह्या स्पर्धेत भाषणाचा व्हिडीओ पाठविण्याची मुदत नुकतीच दि.२१ सप्टेंबरला संपली.
स्वराली निंबकर मुंबई,व संगीता मुनेश्वर घाटंजी यांनी स्पर्धेचे व्हिडीओद्वारे केलेला व संयोजक टिमने सोशलमिडियाद्वारे केलेल्या स्पर्धेच्या व्यापक जाहिरातीचा परिणाम जबरदस्त झाला.गडचिरोली, गोंदिया पासुन थेट मुंबई, कोल्हापुर ..कोकणपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उस्फुर्त प्रतिसाद नोंदवला.तब्बल पाचशेपेक्षा जास्त बालवाक्पटुंनी वक्तृत्व कलेचे कौशल्य पणाला लावत व्हिडीओ पाठवलेत.स्पर्धेच्या नियमानुसार ५०%गुण दिलेल्या व्हिडिओच्या लिंकला येणाऱ्या लाईक्सला असल्यामुळे संयोजकास यु-ट्युब चँनल तयार करुन प्रत्येक विद्यार्थ्यांना लिंक देणे क्रमप्राप्त होते.गेल्या चार दिवसापासून संयोजक समितीची टेक्नोटिम अहोरात्र विद्यार्थ्यांचे व्हिडिओ अपलोड करुन लिंक तयार करण्यासाठी कष्टत होती.काल दिनांक २४ सप्टेंबरला प्रत्येक स्पर्धकाला सुंदर डिझायनिंग केलेल्या आवाहनात्मक पोस्टसह लिंक वाटप करण्यात आली.
एकापेक्षा एक सरस व दर्जेदार व्हिडिओच्या आवाहनाच्या लिंक कालपासून अख्ख्या महाराष्ट्रातील जवळजवळ सगळ्याच ग्रुपला फिरत आहेत.विद्यार्थ्यांनी,पालकांनी व त्यांच्या शिक्षकांनी सदर भाषण स्पर्धेसाठी प्रचंड पुर्वतयारी केल्याचे सदर बालवाक्पटुंचे व्हिडीओ बघतांना सहज लक्षात येते.स्पर्धेच्या माध्यमातुन अप्रतिम वक्तृत्व कलेचे नमुने आज उभ्या महाराष्ट्राला बघायला मिळत आहेत .त्यामुळे शिक्षक संघाच्या उपक्रमाला अभुतपुर्व यश मिळालेचे बोलले जात आहे.
चिमुकल्या भाषणकर्त्यांच त्वेषपुर्ण सादरीकरण,उत्कट हावभाव व उर्जावान बोल ऐकणाऱ्यांचे काळजाचा वेध घेत महाराष्ट्र काबीज करत फिरत आहेत.यादरम्यान काही लक्ष लोक हे व्हिडीओ पाहतिल असा अंदाज संयोजकांनी व्यक्त केलाय.सदर लाईक्स मिळविण्याची अंतिम मुदत ३०सप्टेंबर असुन उर्वरीत ५०% गुणासाठी परीक्षण करणारी टिमही सज्ज झाली आहे.
लवकरच ‘महाराष्ट्राचा दमदार विद्यार्थी वक्ता’
ठरणार असुन पहिल्या सहा क्रमांकात येण्यासाठी स्पर्धकांत प्रचंड चुरस पहायला मिळत आहे.अव्वल येणाऱ्या स्पर्धंकांना नगदी भरघोस बक्षिस व स्मृतीचिन्हासह प्रमाणपत्र मिळणार असुन सहभागी विद्यार्थ्यांनाही आकर्षक प्रमाणपत्र मिळणार आहेत.
सदर बक्षिसांचे वितरण महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजयभाऊ राठोड व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.राज्यभरातुन सर्वच माध्यमांच्या शाळांनी स्पर्धेत भरपूर सहभाग नोंदवलाय.मिळालेल्या व्यापक प्रतिसादामुळे अव्वल बालवाक्पटु शोधण्याचे मोठे आवाहन परिक्षकापुढे उभे राहिले आहे.
शिक्षक हितासाठी कायम तत्पर असणाऱ्या प्रा.शिक्षक संघ विद्यार्थ्यांसाठी तळमळीने काम करत आला आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष तथा स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक श्री.राजुदासजी जाधव,मुख्य भुमिकेत असलेले श्री.रवीभाऊ आडे,टेक्नोटिम श्री कैलास चव्हाण ,श्री प्रवीण जाधव,श्री अविनाश खरतडे,श्री रवि राठोड,श्री राहुल मिस्किनसह परीक्षक टिम स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत. अनोखा व विद्यार्थीप्रीय सुंदर उपक्रम राबवित असल्याबाबत य.जि.प.प्रा.शिक्षकसंघाचे सर्वच स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राचा अव्वल कोण ठरेल ह्याकडे संपूर्ण राज्याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.