Home महाराष्ट्र क्या प्यार ऐसा होता है ????

क्या प्यार ऐसा होता है ????

419

क्या प्यार ऐसा होता है ????

प्रेम असच असतं का ???

अमीन शाह ,

सोलापूर ,

लग्न होऊन अवघे काही दिवस झालेले असताना लग्नानंतर माहेरी पाठवतात तशी ती माहेरी आली मात्र लग्नाआधीच्या प्रियकरासोबत तिने व त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेण्यासाठी चक्क एकाच दोरीचा वापर केल्याचे देखील यावेळी आढळून आले.सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात सोहाळे येथे प्रेमीयुगुलाने पहाटेच्या सुमारास पत्रा शेडच्या अँगलला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या इच्छेविरुद्ध लग्न झाल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. ज्ञानेश्वर रामचंद्र बचुटे ( वय 25 राहणार सोहाळे ) व पूजा प्रवीण बचुटे -पाटील ( वय 21 राहणार जायगव्हान जिल्हा सांगली सध्या राहणार सोहाळे ) अशी प्रेमी युगुलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा संजय बचुटे हिचा प्रवीण भारत पाटील ( राहणार जायगव्हान जिल्हा सांगली ) यांच्याशी 30 ऑगस्ट रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर पूजा ही 13 सप्टेंबर रोजी सोहाळे येथे माहेरी आली. पूजा हिचे लग्नाआधी गावातील ज्ञानेश्वर बचुटे याच्याशी प्रेमसंबंध होते. दरम्यान या दोघांची भेट झाली. त्यानंतर या दोघांनी रात्री सोहाळे येथील माणिक महादेव बचुटे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. माणिक बचुटे हे शेतात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली त्यानंतर त्यांनी ही माहिती कामती पोलिसांना दिली

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आले. कामती पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. अधिक तपास पो हे का बबलू नाईकवाडी करीत आहेत. मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे प्रेमीयुगुलाने घरच्यांच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती हे प्रकरण अजून ताजेच असताना केवळ तीन दिवसात सोहाळे येथे प्रेम प्रकरणातून आत्महत्या करण्याची दुसरी घटना घडली आहे. घडलेल्या घटने मूळे हळहळ वयकत केली जात आहे ,

पूजा आणि ज्ञानेश्वर या दोघांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. ज्ञानेश्वर हा भीमा साखर कारखाना कारखान्यात कामाला होता मात्र लॉकडाऊन काळात काम बंद झाले आणि त्याने स्वतःची टमटम घेऊन मंडप कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय सुरू केला होता पण लग्न झाल्यानंतर पूजा ही माहेरी आली आणि हा घात झाला. अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती