Home महत्वाची बातमी तात्काळ पंचनामे करून सरसगट मदत करा – माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर...

तात्काळ पंचनामे करून सरसगट मदत करा – माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी

134

 

 

सरकार निगरगट्ट असलं तरीदेखील मदत करण्यास भाग पाडू- लोणीकर*

*मदतीसाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे वैयक्तिक अर्ज करावा- लोणीकर यांचे आवाहन*

शेख अथर

परतूर/प्रतिनिधी

मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून 7 लक्ष हेक्‍टरपेक्षा अधिक शेती चे नुकसान झाले आहे त्यापैकी बहुतांश क्षेत्रात अद्याप पाणी असून पंचनामे करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जाता येत नाही अशी परिस्थिती आहे यामध्ये सोयाबीन मूग उडीद मका कापूस यासारख्या विविध पिकांचा समावेश आहेत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे सात हजार हेक्‍टरवर बागायती पिके असून त्यामध्ये ऊस मोसंबी द्राक्ष पपई इत्यादी पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे त्यासाठी सरसकट सर्व शेतकर्‍यांना मदतीची आवश्यकता असून सरकारने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केली

परतूर तालुक्यातील बाबई, डोल्हारा, संकनपुरी यासह मंठा व जालना या तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केली यावेळी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव तहसीलदार रूपा चित्रक तहसीलदार सुमन मोरे गटविकास अधिकारी गुंजकर भाजपा परतुर तालुकाध्यक्ष रमेश भापकर मंठा तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ सभापती संदीप गोरे सभापती रंगनाथ येवले उपसभापती रामप्रसाद थोरात उपसभापती नागेश घारे जालना भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश टकले माजी सभापती रामेश्वर तनपुरे संचालक निवास देशमुख पंचायत समिती सदस्य दिगंबर मुजमुले माजी उपसभापती प्रदीप ढवळे जिल्हा परिषद सदस्य सुदाम प्रधान अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शहाजी राक्षे विशंभर शेळके हनुमंत चिखले महादेव शेळके शंकर पाष्टे गजानन लोणीकर रामदास गुंजाळ गंगा सुपेकर अशोक भांडवले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विद्यमान महाराष्ट्र सरकार फारसे गंभीर नसून माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचा मोठा लढा उभा करून निगरगट्ट असणाऱ्या सरकारला सरसगट मदत देण्यास भाग पाडू असेही लोणीकर यावेळी म्हणाले

*शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे वैयक्तिक अर्ज करावेत – लोणीकर*
रिलायन्स या कंपन्यांकडे पिक विमा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झालेला असून पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे त्यामुळे विमा कंपन्यांनी तात्काळ विमा देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी देखील लोणीकर यांनी यावेळी केली शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी वैयक्तिक अर्ज करणे अपेक्षित असून नुकसान झालेल्या पिकांचा फोटो कंपनीच्या वेबसाईटवर अपलोड करायचा आहे त्यासोबत पीक विमा भरलेली रक्कम आणि इतर बाबी पूर्ण करायच्या आहेत असे आवाहन देखील यावेळी लोणीकर यांनी केले