Home मराठवाडा धनगर’आरक्षणासाठी’ ढोल बजावो, सरकार जगावो आंदोलन…..

धनगर’आरक्षणासाठी’ ढोल बजावो, सरकार जगावो आंदोलन…..

112

 

शेख अथर

परतूर/प्रतिनिधी
धनगर समाजाला आरक्षणा पासून वंचित ठेवणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवार, दि २५ सप्टेंबर रोजी राज्यभरात ” ढोल बजाव, सरकार जगावं” चा नारा दिला होता, या पार्श्वभूमीवर परतूर तहसील कार्यालय समोर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ढोल बजाव सरकार जगावं आंदोलन करण्यात आले.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात हे आंदोलन सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालय, मंदिर परिसरात पंचायत समिती तहसील कार्यालय अश्या विविध ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर परतूर तहसील कार्यालया समोर सकाळी ११:०० वाजता तहसीलदार यांना निवेदन देऊन ढोल बजाव सरकार जगावं हे आंदोलन शुक्रवार दि. २५ रोजी करण्यात आले असून या आंदोलनानं सरकार ला जाग करणं हा यामागचा उद्देश आहे. मागच्या सरकार ने मंजूर केलेले १००० कोटी रुपये धनगर समाजावर खर्च करावेत आणि एस.टी चा दाखला देण्यात यावा अश्या मागण्यासाठी ढोल बजाव सरकार जगावं हे आंदोलन ढोल ताश्याच्या वाजाने हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार यांना सकल धनगर समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले
यावेळी समाजाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.