Home मराठवाडा अखिल विश्व वारकरी परिषदेच्या प्रसिध्दी प्रमुख युवा तालुका अध्यक्षपदी अशोक कंटुले

अखिल विश्व वारकरी परिषदेच्या प्रसिध्दी प्रमुख युवा तालुका अध्यक्षपदी अशोक कंटुले

58
0

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील पत्रकार अशोक कंटुले यांची निवड . अखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य , मुख्य कार्यालय नाशिक अखिल विश्व वारकरी परिषदेचे
नितीन दादा सातपुते मराठवाडा अध्यक्ष , महादेव महाराज ढवळे संपर्कप्रमुख रामकिसन महाराज पारवेकर ,जिल्हा अध्यक्ष शरद महाराज देवडे ,मराठवाडा संघटक माधवराव सावंत शेवाळकर
यांच्या प्रेरणेने सर्वानुमतेअखिल विश्व वारकरी परिषदेच्या युवा प्रसिध्दी प्रमुख घनसावंगी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .अखिल विश्व वारकरी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नितीन सातपुते यांनी ही नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करण्यासोबतच आपन लाभलेल्या वारकरी संप्रदायाच्या वारसा जपत आपण वारकरी संप्रदायाची विचारधारा सातत्याने लेखनीच्या माध्यमातुन समाजा पर्यंत पोहोचवावी संस्कृती ,भाव ,जपत एकसंघ ठेवत
आपल्या कार्यातुन दिसून येत आहे , समाज प्रबोधनातून सकळ जनाचे कल्याण ही परिषदेची विचारधारा आहे, या विचारधारेला अनुसरून आपल्या आजवरच्या कार्याची वाटचाल सुरु आहे आपल्या हातून हे कार्य अविरत आणखीन जोमाने होईल या विश्वासाने आपली या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे .आपले पुढील कार्य सिद्धीस जाईल हीच पांडुरंग चरणी प्रार्थना असे नियुक्ती पत्रकात म्हटले आहे.
या निवडीचे गांव व पंचक्रोषीतील नामवंत किर्तनकार महाराज मंडळी ,भागवतकथा , रामायण कथा , प्रर्वचनकार , भजनी मंडळ वारकरी संप्रदायातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.