Home जळगाव कृषी मालाच्या प्रक्रिया विक्रीतून उत्पन्न मिळवा – संजय महाजन

कृषी मालाच्या प्रक्रिया विक्रीतून उत्पन्न मिळवा – संजय महाजन

80
0

पाल येथे पोषण माह अंतर्गत सोयाबीन दुग्ध निर्मिती विषयांवर प्रशिक्षण…!

 

रावेर (शरीफ शेख)

सातपुडा विकास मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र पाल व कृषी पदवीच्या शेवटच्या वर्षात कृषी कार्यानुभव सत्राचे दूत यांच्या सहकार्याने पोषण माह निमित्ताने महिला गटांसाठी सोयाबीन प्रक्रिया उद्योग व दुग्ध निर्मिती विषयांवर प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पोषण सप्ताह माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे यामध्ये पोषण वृद्धी मूल्य असणार्या पिकांच्या जाती बाबत जनजागृती करण्यात येत आहे यावेळी संजय महाजन ( प्रमुख कृषी विज्ञान केंद्र ) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित महिला गटांना प्रोत्साहित करून सांगितले की आपल्या मालाची प्रक्रिया करून त्याची विक्री करून आपले उत्पादन वाढवावे तसेच महेश महाजन ( पिक संरक्षण शास्त्रज्ञ ) यांनी निर्मिती विषयी प्रात्याक्षिक करून दाखवले व मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र चव्हाण कैलास चव्हाण व रहेमान तडवी यांनी परिश्रम घेतले.