Home मराठवाडा रघुनाथ मुकने यांच्या प्रयत्नातून मुरमा गावात मजुरांना जाॅबकार्ड वितरण

रघुनाथ मुकने यांच्या प्रयत्नातून मुरमा गावात मजुरांना जाॅबकार्ड वितरण

133
0

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्हा घनसावंगी तालुक्यातील मुरमा खुर्द येथे रोजगार हमी योजना अंतर्गत शासकीय नोंदणीकृत मजुर यांना आतापर्यंत शासनाचे जॉब कार्ड वाटप केल्या गेले नव्हते.सांस्कृतीक सेल भाजपा तालुकाध्यक्ष रघुनाथ मुकने यांनी पाठपुरावा करून व मुरमा गावचे ग्रामसेवक गायकवाड यांच्याकडे व पंचायत समिती मध्ये सातत्याने संदर्भात चौकशी करून जॉब कार्डाची मागणी केली होती. मुरमा गावांमध्ये दवंडी देऊन सांगितले होते की ज्यांनाजॉब कार्ड नाही अशांनी रघुनाथ मुकणे यांच्याकडे नाव द्यावे व लागणारे कागदपत्र द्यावे , या मध्ये खरोखरच ज्यांना गरज होती असेच मजूर या जॉब कार्डापासून वंचित राहिले होते व मुरमा गावचे ग्रामसेवक गायकवाड यांनी जॉब कार्ड उपलब्ध करून दिले . दिनांक 23/09/2020 बुधवार रोजी मुरमा ग्रामपंचायत कार्यालय मध्ये जॉब कार्ड वाटण्यात आले. त्यावेळी मुरमा गावचे सरपंच श्याम नाना मुकणे ,रघुनाथ मुकणे दिनकर मुकणे ,महादेव थुटे, शामराव मुकणे ,कल्याण जाधव, चत्रभुज यादव व गावकरी उपस्थित होते.