Home महत्वाची बातमी कारच्या धडकेत चार वर्षीय बालक ठार

कारच्या धडकेत चार वर्षीय बालक ठार

358

 

तळेगाव – आष्टी राज्यमहामार्गावरील गावालगतची घटना.

इकबाल शेख ,

तळेगांव (शा.पं.) :- राज्यमहामार्ग तळेगांव – आष्टी रोडवर बुधवारी सायंकाळी सहा वाजताचे सुमारास गावालगत शाैचावरुन रस्ता ओलांडतांना आष्टीकडुन तळेगांव कडे येणार्‍या कार क्रं. एम. एच. २९ एल ९९४ ने जोरदार धडक दिली. या धडकेत चि. संकेत संजय चाैधरी वय ४ वर्षे रा.तळेगांव या बालकाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला.
तळेगांव – आष्टी राज्यमहामार्गालगत असलेल्या जुन्या वस्तीत चाैधरी कुटुंब राहत असुन मृतक बालकाचे वडीलाचा आजारामुळे मागील वर्षीच मृत्यु झाल्याने कुटुंबांच्या पालन पोषनाची जबाबदारी आईवरच आहे त्यामुळे मृतक बालकाची आई घरासमोरीलच शेतात कामावर गेली होती बहिनी व भावा सोबत हा बालक आपल्या घरी होता त्याला शाैच आल्याने सदर बालक हा राज्यमहामार्गाच्या रुंदिकरण करण्यात आलेल्या रोडच्या काठाने बांधण्यात आलेल्या घराच्या समोरील नालीवर शाैचास गेला होता शाैचावरुन रोड अोलांडुन घराकडे येण्यास निघाला असता आष्टी कडुन तळेगाव कडे येणार्‍या भरघाव कारसमोर तो अचानक आल्याने त्याला कारची जबर धडक बसली. कार चालकाने घटनास्थळावरुन कारसह पळ काढला असता. जखमी अवस्थेतील बालकाला स्थानीक ग्रामस्थांच्या मदतीने दुसर्‍या वाहनाने आर्वी येथील एका खाजगी दवाखाण्यात नेले असता त्या बालकाला मृत घोषीत केले. तळेगांव पोलीसांनी घटनेची नोंद घेतली असुन रात्री उशीरा कारसह चालक पांडुरंग इंगळे वय.४३ वर्षे याला त्याचे घरुन ताब्यात घेतले आहे.

*कॅनस्ट्रक्शन कंपनीवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी*
सदर तळेगाव आष्टी रोडचे साैंदर्यीकरनाचे काम सुरु असुन गावालगत तिन लेन आहे. त्यापैकी मधातील लेननेच रहदारी सुरु असुन दोन्ही बाजुच्या लेनने साैंदर्यीकरणाचे काम सुरु आहे. काम सुरु असलेला रोडला कोणत्याच दिशेने बंद करण्यात आले नसुन वळन मार्गाचा फलक सुद्धा लावण्यात आले नव्हते त्यामुळे कार चालकाने काम सुरु असलेल्याच लेनने गाडी टाकल्यामुळे अपघात कंपनीच्या हलगर्जीपणाने झाल्याचे मृतक बालकाच्या नातेवाईकासह ग्रामस्थांचा आरोप असुन गुरुवारला दुपारी १.३० वाजताचे दरम्यान बालकाचे शविच्छेदन करुन आनले असता बालकाचा मृतदेह तळेगांव पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवुन कॅनस्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा दाखल करे पर्यत मृतदेह हटविणार नसल्याच्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे काहि वेळ पोलीस स्टेशनसमोर तनावाचे वातावरन निर्माण झाले होते.

प्रतिनिधि
ईकबाल शेख
तळेगाव शा. पंत वर्धा.
९८३४४५३४०४