Home मुंबई भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवली येथिल भारत रत्न डॉ बाबासाहेवाचा...

भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवली येथिल भारत रत्न डॉ बाबासाहेवाचा पुतळा सुरक्षेअभावी वाऱ्यावर ॥ सगळीकडे कचरा व गवत साचल्याने घानच घान ॥ ॥ 

137
0

सर्वव्यापी मोठे आंदोलन उभारणार संजय बोर्डे

 

प्रतिनिधी – रवि गवळी

डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय कांदिवली मुंबई येथे २०१७ रोजी लोकनायक प्रतिष्ठानच्या वतीने व रिपब्लिकन पार्टी बहुजन संघटना अस्मिता महिला संघ भीमराज कि बेटी अशा विविध पक्ष व संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. व त्यावेळेस रुग्णालय प्रशासनाने विविध मागण्या मान्य करण्यात येतील असे लेखी पत्र दिले होते तरीसुद्धा भारतीय संविधान निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारण्यात आला आहे॥ पुतळाची देख रेख करणारी संस्था व महानगरपालिकेने याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे. रुग्णालयाचे अधीक्षक प्रमोद नगरकर हे जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करत आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या वर लक्ष देत नाहीत आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला सपूर्ण कचरा व मोठ मोठे झाडे आणि गवत उगवल्या मुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे।। डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुरेशी सुरक्षा नाही त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नाही वरील विषयासाठी वैद्यकीय अधीक्षक व अधिकारी शांताराम कवडे याना जेष्ठ पत्रकार व रीपाई नेते व फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे डेशींग व प्रख्यात पत्रकार संजय बोर्डे यानी तक्रार अर्ज निवेदन दिले आहे। त्याचबरोबर रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र सचिव विजय गोरे यांनी सुद्धा पत्र दिले आहे ऑल इंडिया त्यानंतर उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ काळे यांनी सुधारित पत्र दिले आहे.तसेच बऱ्याच पक्ष संघटना महिला मंडळ यांनीसुद्धा वारंवार तक्रार केली आहे. तरी सहाय्यक आयुक्त संजय कुराडे व रुग्णालय प्रशासन याकडे कुणी लक्ष देयील का?? यासाठी लवकरच पुन्हा एकदा एक खूप मोठे आंदोलन उभारण्यात येणार आहे. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व त्यांच्या सहकारी संघटना यांनी जाहीर केला आहे.