Home जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांना वाढदिवसानिमित्त विविध संघटनांतर्फे अभिष्ट चिंतन.

जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांना वाढदिवसानिमित्त विविध संघटनांतर्फे अभिष्ट चिंतन.

143

क्रीडा संकुल सुरू करा मागणी..!

रावेर (शरीफ शेख)

जळगाव – जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित दीक्षित यांचे बुधवारी २३ सप्टेंबर रोजी वाढदिवस असल्याने त्यांना जळगाव जिल्हा व राज्यस्तरीय विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार तथा हॉकी व फुटबॉल जिल्हा संघटनेचे सचिव फारुक शेख, महाराष्ट्र राज्य हॉकी संघटनेच्या सह सचिव व डॉक्टर अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका प्रोफेसर डॉक्टर अनिता कोल्हे, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक तथा जिल्हा संघटनेचे सचिव विवेक आळवणी व आंतरराष्ट्रीय फीडे मास्टर व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव प्रवीण ठाकरे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

क्रीडा संकुल वैयक्तिक क्रीडा प्रकारासाठी साठी उघडा- मागणी

यावेळी क्रीडा संघटनांच्या वतीने शासकीय मार्गदर्शक व संघटक पुरस्कारप्राप्त फारुक शेख यांनी जिल्हा क्रीडा संकुल क्रीडांगण हे वैयक्तिक क्रीडा प्रकारासाठी उघडून खेळाडूंना आपला सराव करू द्या तसेच जे क्रीडा प्रकार वयक्तिक संघ मध्ये येतात त्यांचा सराव करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली असता श्री दीक्षित यांनी त्यास होकार दिला असून लवकरच क्रीडा संकुल खेळाडूंना वैयक्तिक क्रीडा प्रकारासाठी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.