Home जळगाव बाप्पाची मूषक सेना द्वारे जळगाव चे फारुक शेख सन्मानित…..

बाप्पाची मूषक सेना द्वारे जळगाव चे फारुक शेख सन्मानित…..

75
0

रावेर (शरीफ शेख) 

राज्यातील १० पुरस्कारथी मध्ये एकमेव मुस्लिम

जळगाव – शहरातील क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये कायमच चर्चेत असणारं एकमेव नाव म्हणजे फारूक शेख

जळगाव शहरातील मुस्लिम इदगाह व कब्रस्तान ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी, जळगाव जिल्हा मनीयार बिरादरीचे अध्यक्ष व जळगाव कोविड केअर युनिटचे समन्वयक तथा प्रसिद्धीप्रमुख *विशेष म्हणजे डब्ल्यूएचओ आणि महाराष्ट्र शासनाने पन्नास वर्षांवरील व्यक्ती आणि मधुमेहाच्या रुग्णांनी घराच्या बाहेर न पडता घरातच स्वतःला सुरक्षित ठेवावे अशी सूचना दिलेली असतांना देखील फारुक शेख हे २६ वर्षा पासून मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यांचे वय ५९ वर्ष आहे तरीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, आपणही काही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून या कोरोना महामारी च्या झंजावती वादळात आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून गरीब,कष्टकरी वर्गाला आपल्या मदतीची ज्योत अखंडपणे तेवत ठेवली* लॉकडाऊन पासून आज घडीपर्यंत एक कोरोणा योद्धा म्हणून सातत्याने कार्य पार पाडत आहे.

गरिबांसाठी, रुग्णांसाठी ,कोरोना रुग्ण व कोरोना बाधित मृता साठी
जंग जंग पछाडत आहेत अशा या अवलियाचा चितळे उद्योग समूहाने बाप्पाची मूषक सेना द्वारे सलाम करून त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे.

महाराष्ट्र राज्यातील फक्त दहा व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला असून त्यात एकमेव मुस्लिम समाजातील शेख हे होय.

*फारुक शेख यांनी कधीच जातीच्या चौकटीमध्ये काम न करतात् त्यांची नेहमीच सर्वसमावेशक अशी भूमिका राहिलेली आहे. एच आय व्ही च्या सुमारे ३०० बालकांचे पालक म्हणून ते पाच वर्षां पासून सेवा देत आहे म्हणूनच त्यांना या अगोदरही अनेक सामाजिक संस्थांनी विविध पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे*.

कोरोना च्या संकटकाळात अनेक घटक कार्यरत असून सामाजिक क्षेत्रातील असंख्य संघटना व व्यक्ती तर अधिक काम करून समाजात आदर्श उदाहरण निर्माण करीत आहे त्यात जळगावकरांना क्रीडा क्षेत्राशी अवगत असलेले फारुक शेख अब्दुल्ला हे आज कोरोना योध्दा म्हणून परिचित झालेले आहे.

जळगावातील कोरोना बाधित आणि मृत्यू पावलेले प्रथम दोन्ही इसम म्हणजे मेहरुण व सालार नगर मधील मुस्लिम समाजाचे होते. व त्यातल्या त्यात म्हणजे शेख यांच्या घरातीलच एक नव्हे तर दोन सख्खे मेहुणे ठाणे व जळगाव येथील (मोठी बहीण व लहान बहिणीचे पती ) हे सुद्धा कोरोना आजाराने मृत पावले परंतु ते दुःख कवटाळत न बसता घरातील कोरोना ने मृत झालेल्या व्यक्तीच्या वेदना काय असतात या जाणिवेतून आपण समाजासाठी काहीतरी करावे म्हणूनच त्यांनी जळगावात सर्व सामाजिक संघटनांना एकत्रित करून जळगाव केअर युनिट ची स्थापना केली .

*मेडिकल सर्वेक्षण व वैद्यकीय शिबिरे*
जळगाव कोविड केअर युनिट च्या माध्यमाने सर्वप्रथम जळगाव शहरात व ग्रामीण भागातील खास करून मुस्लिम समाजातील लोकांची व त्या समाजात जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची भीती दूर करण्यासाठी त्यांनी ठीक ठिकाणी कौटुंबिक सर्वेक्षण व वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले त्याद्वारे समुपदेश व मोफत औषधी यांचे वाटप केले सुमारे पंचवीस शिबिराच्या माध्यमातून पन्नास ते साठ हजार रुग्णांना औषधे दिली तर जे काही या कोरोना चे संशयास्पद आढळून आले त्यांच्यावर औषधोपचार करुन त्यांना बरे करण्यात आले. सुमारे सव्वा ते दीड लाख कुटुंबीयांचे सर्वेक्षण केले व त्यांच्या मनातील भीती दूर केली त्याच प्रमाणे डॉक्टरांच्या मदतीने वार्ड क्लिनिक सुरु करण्यास डॉक्टरांना प्रोत्साहित केले.

*डॉक्टर व दवाखाने बाबत दक्षता*
ज्या रुग्णावर उपचार सुरू आहे,त्यांच्या उपचारावर,तसेच दवाखाने व तेथील सेवा सवलती बाबत एवढेच नव्हेतर वेळप्रसंगी निष्काळजीपणा करणारे डॉक्टर व दवाखाने बाबत ची लेखी तक्रार सुद्धा शेख करीत आहेत.

लॉक डाउन मुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली असताना त्यांनी
*हजारो कुटुंबीयांना रेशन किट वाटप*

लॉकडाउनच्या काळात फारुक शेख यांनी जळगाव जिल्हा मानियार बिरादरी च्या हे माध्यमाने शहरात व ग्रामीण भागात सुमारे ३५२५ कुटुंबीयांना रेशन किट वाटप केले होते त्यात गहू, तांदूळ ,दाळ, गोडेतेल ,साखर, चहा व चटणी इत्यादींचा समावेश होता.

*शेकडो बाधितांचा दफन विधी*

जळगाव मुस्लिम कब्रस्तान चे जनरल सेक्रेटरी म्हणून कार्यरत असल्याने दफनविधी ची मुख्य जबाबदारी सुद्धा अप्रत्यक्षरित्या त्यांच्याकडे आली व कोरोना पॉझिटिव रुग्णाचा दफन विधी चा पहिला अनुभव जळगाव कर म्हणून त्यांना आला शहरातील दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तिसऱ्या दिवशी मृत्यू झाल्याने त्या डेथ बॉडी ला कब्रस्तान मध्ये मनपा चालकाने शव वाहिके द्वारे आणले व तो चालक आपल्या वाहनापासून स्वतःह १०० मीटर लांब जाऊन उभे राहून गेले. त्या ठिकाणी आलेले एमआयडीसी पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सुद्धा ३०० मीटर लांब जाऊन उभे राहीले. अशावेळी फक्त मयत व्यक्तीचे तीन मुलं, फारुक शेख त्यांचे सहकारी अनिस शाह यांनी त्या मृताचे दफनविधी केले तेव्हा मनातील भीती दूर झाली व आजपर्यंत शेकडो पॉझिटिव्ह कोरोना बाधित मृतांचे दफन विधी केले आहे व करीत राहणारआहे.
कबरस्थान ट्रस्ट च्या कार्याची दखल मनपा वेळो वेळी घेत असून आज पर्यंत एकही मृत व्यक्तीच्या नाते वाईकांची तक्रार नाही वा नकारात्मक बातमी सुद्धा नाही.

*कोरोना योध्दा म्हणून अनेक संस्थांनी केले सन्मानित*

फारूक शेख हे ज्या संघटना मार्फत कार्य करीत आहे त्याच्या या कार्याची दखल जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव शहर महानगरपालिका, तसेच महाराष्ट्र युवक काँग्रेस, वेल्फेअर मेमन (डब्ल्यू एम ओ) मुंबई , होप फाउंडेशन नाशिक व वर्ड मेमन ऑर्गनायझेशन (एन आय सी ), दुबई. सह नुकतेच पुणे येथील उत्सव विघ्नहर्त्याचा बाप्पांच्या मूषक सेनेच्या सेनेचा हा चितळे उद्योग समूहाने शेख यांचा गौरव करताना प्रमाणित केले आहे की.
आजच्या आपमतलबी जगात समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना मदत करणे, त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी हात देण ही भावना दुर्मिळ झाली आहे. परंतु आपण सर्व एकाच समाजात राहतो म्हणून समाजाप्रती आपलीही काही जबाबदारी आहे हे आपण कोरोनासारख्या जागतिक संकटाच्या काळात काम करून दाखवून दिलंत. आपण केलेल्या कार्याला आमचे अभिवादन.
म्हणून भागीदार चितळे उद्योग समूहाचे संजय चितळे यांनी त्यांचा गौरव केलेला आहे.

*सेवा ही “सलह” म्हणजे ईश्वर सेवा होय*
फारुक शेख म्हणतात की भुकेलेल्याना अन्न -जेवण देणे, रुग्णाची सेवा व काळजी घेणे, मृतांचे दफन विधी करणे हे इस्लाम धर्मात अत्यंत चांगले व पवित्र असे सेवाकार्य म्हणून पवित्र कुराणात व अंतिम प्रेषित यांच्या जीवन चारित्रा वरून दिसून येते व त्याचे पुण्य मोठया प्रमाणात मिळते या तत्त्वानुसार आम्ही हे कार्य करीत असून त्यात मला अनुभवाच्या च्या आधारे जास्त काम करण्याचे श्रेय मिळत असल्याने इतर संस्था मला वैयक्तिक पुरस्कार देत आहे. वास्तविक तो माझा एकट्याचा पुरस्कार नसून सर्वांचा आहे. आम्ही कधीच ,कोणत्याही जातीपातीचा किंवा धर्म व पंथाचा विचार करत नाही. माणुसकीचा, रुग्णसेवेचा, आपला धर्म आधी पाळायला हवा असे फारूक शेख यांना वाटते.

मानियार बिरादरी असो इदगाह कब्रस्तान ट्रस्ट असो की जळगाव कोविड केअर युनिट असो या तिन्ही संघटना विविध प्रकारे सेवा करीत आहे म्हणूनच जीवाची परवा न करता *”ईश भय”**ठेवून माणुसकीच्या धर्मासाठी आम्ही काम करीत असलो तरी इतरांच्या तुलनेत आमचे व माझे योगदान खूपच कमी असल्याची खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली.
या समाज कार्या साठी मुफ्ती अतिकउर रहेमान,हाजी गफ्फार मलिक,मजीद राणाणी, सैयद चाँद,डॉ जावेद,अनिस शाह, आबीद हारून,सलीम शेख,डॉ सुयोग चौधरी,डॉ मंधान पंडित व सर्व बीयूएमएस डॉक्टर सह आपले पूर्ण कुटुंबीयांचे सुद्धा आभार मानले आहे.