Home विदर्भ संस्थात्मक अलगीकरणात राहण्यास इच्छुक नसलेल्या अतिसौम्य लक्षणे असणा-या रुग्णांना गृहअलगीकरणात राहण्याची परवाणगी

संस्थात्मक अलगीकरणात राहण्यास इच्छुक नसलेल्या अतिसौम्य लक्षणे असणा-या रुग्णांना गृहअलगीकरणात राहण्याची परवाणगी

149

योगेश कांबळे

वर्धा , दि.22 – सध्या जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये राहण्याच्या भितीने तपासणी करण्याकरीता समोर येत नाहीत. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गृह विलगीकरणाचे नियम अधिक शिथिल करण्याची गरज असल्यामुळे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी कोरोना बाधित असलेले परंतु अतिसौम्य लक्षणे असलेले तसेच लक्षणे नसणा-या संस्थात्मक विलगीकरणात राहण्यास इच्छुक नसणा-या रुग्णांनी स्वयंघोषणापत्र सादर केल्यास गृहविलगीकरणात राहण्याची परवाणगी देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले.
गृहविलगीकरणामध्ये सबंधित रुग्णांनी व त्यांच्या कुटूंबियांनी घ्यावयाची काळजी संदर्भात मार्गदर्शक तत्वे त्यांना देण्यात येईल. गृहविलगीकरणातील कालावधीमध्ये असणा-या ज्या रुग्णांची ईच्छा असेल ते खाजगी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेऊ शकतील. त्याकरीता त्यांना Medotrack या मोबाईल ॲपचा उपयोग करावा लागेल. तथापी खाजगी डॉक्टरांच्या सेवा व औषधोपचार घ्यायचा असल्यास त्याचा खर्च सबंधित रुग्णाला अदा करावा लागेल. तसेच एखादया रुग्णाला रुग्णालयात भरती करावे लागल्यास शासकिय नियमानुसार रुग्णालयात उपचार करण्यात येईल. गृह विलगीकरण कालावधीमध्ये जे रुग्ण गृह अलगिरण कालावधी त शासकिय वैद्यकिय सेवा घेऊ इच्छिणा-या रुग्णांना निशु:ल्क वैद्यकिय सेवा पुरविण्यात येईल. तसेच त्यांना संपर्कासाठी परिचारिका अथवा वैद्यकिय अधिकारी यांचे मोबाईल क्रमांक देण्यात येईल.
गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांनी अथवा कुटूंबातील सदस्यांनी वैद्यकिय सल्ल्याशिवाय विनापरवाणगी घराबाहेर पडल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 नुसार तसेच भारतीय दंड विधान 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच गृहअलगीकरणातील नियम मोडल्यास 10 हजार रुपये दंड आकारण्यात येईल तसेच 14 दिवस संपूर्ण कुंटूंबास संस्थात्मक विलगीकरणा ठेवण्यात येईल.

त्यामुळे या नविन उपाययोजने नुसार जास्तीत जास्त लोंकानी कोविड टेस्ट करुन घ्यावी असे आवाहन श्री. भीमनवार यांनी केले आहे.