Home बुलडाणा पत्नीचा खून करून पसार झालेल्या पतीचा मृतदेह मिळाला ,

पत्नीचा खून करून पसार झालेल्या पतीचा मृतदेह मिळाला ,

432

 

हत्या की आत्महत्या तपास सुरू ,

अमीन शाह

बुलडाणा ,

पत्नीचा खुन करून फरार झालेल्या युवकाचे प्रेत झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले अवस्थेत सापडला आहे . मृतकाचे शिर हे झाडाला लटकलेले असुन बाकी थड हे खाली गळुन पडलेल्या अवस्थेत होते . या घटनेची माहीती परिसरातील शेतकऱ्याना जेव्हा दुर्गधी आली तेव्हा तेथे जाऊन पाहिले असता हा मृतदेह दिसून आला त्यावेळी शेतकऱ्यांनि पोलीसाना दिली यावेळी घटनेची माहीती मिळताच ठाणेदार रविंद्र देशमुख यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख , लेखनिक चंद्रशेखर मुरडकर , गोपनीय विभागाचे कैलास चतरकर पो का तेजराव भोकरे , पोहका रामदास वैराळ , पो का भागवत खाडे , यांनी घटनास्थळी भेट देउन पंचनामा केला असता सदर युवक हा हिरडव येथील पत्नीचा खुन करून फरार झालेला विकास घायाळ असल्याचे त्याच्या जवळील पाकीट मध्ये असलेल्या आधार कार्ड वरून समजले तालुक्यामध्ये खुन व आत्महत्येचे प्रकार घडत असून तालुक्यांतील हिरडव येथे ३ सष्टेबर २०२०  रोजी या युवकाने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली होती युवकाची आत्महत्या की हत्या अशी चर्चा सध्या लोकांत सुरू असून लोणार पोलीसाच्या मागे शुल्काष्ठ संपेना . सदर युतकाचे मृतदेह हे कुजलेल्या अवस्थेत होते शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर ही हत्या की आत्महत्या हे समजणार असून या घटनेचा तपास ठाणेदार हे करीत आहे ,