Home बुलडाणा सिंदखेडराजा मतदार संघात उडाला जनता कर्फ्यु चा फज्जा ,

सिंदखेडराजा मतदार संघात उडाला जनता कर्फ्यु चा फज्जा ,

284
0

सिंदखेडराजा मतदार संघात उडाला जनता कर्फ्यु चा फज्जा ,

 

गर्दीने गाठला उचांक ,

कार्यवाही कोण करणार ???

 

अमीन शाह ,

बुलडाणा , गेल्या दोन दिवसा पासून बुलडाणा जिल्ह्या सह सिंदखेडराजा मतदार संघात करोना वायरस च्या रुग्णाची वाढती संख्या रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित बैठकीत मा , पालकमंत्री डॉ , राजेंद्रजी शिंगणे साहेब यांनी जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून जनता कर्फ्यु ची घोषणा केली होती जिल्हाधिकारी यांनी ही बंद चे आदेश काढले होते ,मात्र बंद चे आदेश असतांनाही आज मतदार संघातील अनेक मोठ्या गावात जसे साखरखेर्डा देऊलगावराजा , दुसरबीड , येथे अनेक दुकाने सुरू असल्याचे दिसत होते , देऊलगावराजा येथे तर आज आठवडी बाजार असल्यामुळे गर्दीने उच्चानक गाठला होता अनेक दुकानदार व नागरिक विना मासक खरेदी विक्री करतांना दिसत होते , प्रश्न एकच आहे की कार्यवाही कोण करणार ??? ग्रामपंचायत व नगरपालिका ह्यांनी लाऊडस्पीकर लावून बंद चे उल्लंघन केल्यास काय होणार किती दंड होणार हे जाहीर केले इथं पर्यंत सर्व ठीक आहे मात्र आज सुरू असलेल्या काही प्रतिष्ठाने व व्यापाऱ्यांनी आम्ही या बंद ला मानत नसल्याचे दिसून आले साहेबांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मतदार संघातील साखरखेर्डा व देऊळगावराजा ह्या दोन प्रमुख गाव परिसरा मध्ये तर करोना वायरस ने थैमान घातले असून रोज रुग्ण संख्या वाढत आहे अनेक अनामिक रुग्ण हे खुले आम विना मास्क फिरून करोना वायरस पसरवीत आहे ,अश्याने करोना ची साखळी कशी तुटणार ??जनता कर्फ्यु च्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे सर्व सुरू असलेल्या दुकानावर खरेदी साठी लोकांची गर्दी होत आहे हे सर्व उघड्या डोळ्याने पोलीस व प्रशासन पाहत असल्याने जनता कर्फ्यु चा उल्लंघन करणार्यांवर कार्यवाही कोण करणार ??? बंद करण्याची जवाबदारी कोणावर असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे , जनता कर्फ्यु असाच असतो का ??? जनता कर्फ्यु चा उल्लंघन करणाऱ्या वर कार्यवाही कोण करणार साहेब असे अनेक प्रश्न आहेत ,

मटण दारू खरेदी साठी गर्दी ,

आज अनेक प्रमुख गावात लोक मटण अन दारू खरेदी साठी गर्दी करीत असल्याचे ही दिसून आले आहे ,

योग्य निर्णय ,

बुलडाणा जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता करोना ची चैन तोडण्यासाठी मा , डॉ , राजेंद्र शिंगणे साहेबांनी एक चांगला निर्णय घेतला आहे बुलडाणा जिल्ह्यातील जनतेनेही या जनता कर्फ्यु आदेशाचे पालन करून सहकार्य करायला हवे शेवटी हा जनता कर्फ्यु आपल्या भल्या चांगल्या साठीच आहे असे ही काही जाणकार लोक बोलत आहेत ,